Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परवानगी असताना बैठ्या भाजीपाला, फाळ विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई


विक्रेत्यांकडून प्रशासनाच्या सूचनेचे पालन!

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१५ - एकाच ठिकाणी बसणाऱ्या भाजीपाल व फळ विक्रेत्यांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून विक्रीस परवानगी आहे. असे असतानाही पोलिसांकडून 'त्या' भाजीपाला, फाळे विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. यामुळे पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

भाजीपाला विकणाऱ्यांना एका ठिकाणी अथवा फेरीद्वारे गर्दी टाळून विकण्यास परवानगी असल्याचे दि.१३ एप्रिलच्या आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट म्हटले आहे. या आदेशानुसार विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीस प्रारंभ केले असतानाही 'त्या' भाजीपाल, फळे विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यामुळे मोठ्या मेहनतीने आणलेला भाजीपाला अथवा फाळे त्याच दिवशी विक्री न केल्या 'त्या' भाजीवाल्याचे अथवा फाळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

वास्तविक कोरोनाच्या पाश्वभूमीवर भाजीपाला व फळे विक्रेत्यांनीही प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. 
दरम्यान, जिल्हाधिकारी मंगळवारी (दि.१४) काढलेल्या आदेशामुळे पोलीस, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पत्रकार, शेतकऱ्यांना पेट्रोल नाकारले. या नगर जिल्हाधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रमामुळे
खाजगी वाहनांना पेट्रोल बंदी केल्याने अत्यावश्यक सेवाही विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे.

Post a Comment

0 Comments