Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर दि.14-कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून  जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी  जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त, व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस दिनांक 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
      कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी यापूर्वी जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था, अंगणवाडया, कोचिंग क्‍लासेस दि. 14 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. महाराष्‍ट्रातील लॉकडाऊन हे दिनांक 30 एप्रिल 2020 चे मध्‍यरात्री पर्यत लागू करण्‍यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नव्याने दिनांक ३० एप्रिलपर्यंत आदेश जारी करण्यात आले आहेत.
     कोणतीही  व्‍यक्‍ती  संस्‍था,  संघटना यांनी  या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास  ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कमल 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.            

  

Post a Comment

0 Comments