Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डाकघर विभागामार्फत ज्‍येष्‍ठ नागरिक व अपंगांसाठी घरपोच पेन्‍शन पेमेंटची व्‍यवस्‍था


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.7 - कोरोना विषाणूच्‍या संसर्गामुळे  संपूर्ण भारतभर  संचारबंदी लागू करण्‍यात आली असून 14 एप्रिल 2020 पर्यत लॉक डाऊन  करण्‍यात आले आहे.  अशा परिस्थितीत अहमदनगर डाक विभागातील अत्‍यंत वयस्‍कर व  अंपग पेन्‍शनर यांच्‍यासाठी घरपोच पेन्‍शन देण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे. अशा पेन्‍शन धारकांनी त्‍यांच्‍या जवळच्‍या पोस्‍ट ऑफिसमध्‍ये संपर्क साधावा किंवा विभागीय कार्यालयास (दूरध्‍वनी क्रमांक 0241-2355010) व प्रधान डाकघर कार्यालय , अहमदनगर ( दूरध्‍वनी क्र. 0241-2355036) या दूरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
     विभागातील खेडोपाडयामध्‍ये जे विविध राष्‍ट्रीयकृत बँकाचे ग्राहक आहेत व ज्‍यांचे खाते आधार संलग्‍न  आहे. त्‍यांना देखील  लॉकडाऊन परिस्थितीमुळे  त्‍यांचे बॅक खात्‍यातील  पैस काढण्‍यास अडचण निर्माण होत आहे. परंतू अशा ग्राहकांना देखील तेथील संबंधीत पोस्‍टमान मार्फत  एका वेळेस दहा हजार रुपये पर्यन्‍त आधार संलग्‍न भुगतान प्रणाली द्वारे पैसे देण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे.  बँकेच्‍या ग्राहकांना देखील अशी सुविधा पोस्‍टमन मार्फत घरपोच मिळाल्‍याने त्‍यांना घराबाहेर पडण्‍याची आवश्‍यकता नाही. बँकेच्‍या ग्राहकांना त्‍यांचे पैसे काढण्‍यात अडचण  येत आहे.   त्‍यांनी आपल्‍या  भागातील पोस्‍टमन / ग्रामीण डाक सेवक यांच्‍याशी संपर्क साधावा.
   तसेच सध्‍याच्‍या काळात वाहतुकीची सर्व साधने बंद असल्‍याने कोणत्‍याही  वस्‍तूची  ने- आण करणे अशक्‍य झाले आहे. परंतू अशा परिस्थितीत आजारी व्‍यक्‍तीपर्यत औषधे पोहोचविणे हे अत्‍यंत  महत्‍वाचे आहे. यासाठी पोस्‍ट खात्‍याने ठराविक ठिकाणी विशेष व्‍यवस्‍था केलेली आहे.  त्‍यामुळे  ज्‍या व्‍यक्‍तीना  ठराविक ठिकाणी औषधे पाठवायचे आहेत. त्‍यांनी विभागीय डाकघर  कार्यालय अहमदनगर येथे ( दूरध्‍वनी क्र. 0241-2355010) दूरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन असे वरिष्‍ठ अधीक्षक जे टी भोसले यांनी सांगितले. 

                                                             

Post a Comment

0 Comments