Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 245 कोटी रुपये जमा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई दि. १६: कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून मदतीचे शेकडो हात पुढे येत आहेत त्याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४५ कोटी रुपये जमा झाले आहेत.
कोराना विषाणुविरुध्द लढतांना आपली एकजुट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणुविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तु, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
कोरोना विषाणु विरुद्ध लढतांना मदत करण्यासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्याचा बचतखाते क्रमांक 39239591720  आहे.  

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

 Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch, 
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
----👍
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या  80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

Post a Comment

0 Comments