Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खासगी कामगार, छोट्या दुकानदारांना राज्य सरकारने मदत करावी ; सचिन गुलदगड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२६- नोंदणीकृत, अनोंदणीकृत, संघटित, असंघटीत कामगार यांना शासकीय मदत मिळवी, माथाडी कामगार, कापड दुकान, स्टेशनरी व जनरल स्टोअर्स दुकान, हॉटेल व सराफ बाजार, मंडई दुकानवरील रोजंदारी करणारे कमर्चारी यांना शासनाकडून अनुदानापोटी तातडीने मदत मिळवी, अशी मागणी श्री. संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
देशभर कोविड - 19, कोरोना या वेश्र्विक महामारी विषाणू ने थैमान घातला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी शासनाच्या वतीने दिनांक २१ मार्च २०२० पासून लॉकडाऊन, संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आला आहे, केला आहे. वर विषयामध्ये नमूद केलेले दैनंदिन व्यासाय करून आपली उपजिविका चालवणारे हातावर पोट असणारे सर्व जण ह्या कोविड - 19, कोरोना सारख्या वैश्विक महामारी पासून बाधित झाले आहेत. सरकार सर्व स्तरावर सर्वाना मदत करण्याचा विचार करत आहे. परंतु आपली दैनंदिन उपजीविका नोंदणीकृत, अनोंदणीकृत, संघटित, असंघटीत कामगार ऊदा -माथाडी कामगार, कापड दुकान, स्टेशनरी व जनरल स्टोअर्स दुकान, हॉटेल व सराफ बाजार, मंडई दुकान वरील रोजंदारी करणारे कमर्चारी हे वरील दुकानात दररोज काम करुन आपला उदरनिर्वाह, उपजीविका चालवत असतात ते सुद्धा ह्या लॉकडाऊन पासून, एक महिन्यापासून आपले काम बंद असल्यामुळे घरी बसले आहेत. सरकार कडून यांना काहीच मदत होताना दिसत नाही आहे.
दैनंदिन रोजगारावर उदरनिर्वाह, घर तसेच घेतलेले कर्ज त्याचे हप्ते या मधून ते भरत असतात, महीनाभर काम धंदा एकदम ठप्प असल्यामुळे अाणि उदरनिर्वाहाचा दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याने दैनंदिन उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या या सर्वांन पुढे निर्माण झाली आहे, एवढंच नाही तर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणू चा वाढता प्रभाव लक्षात घेता अजुन किती दिवस या संकटाला सामोरे जावे लागेल हे माहीत नसल्याने या सर्वांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. तरी शासनाने याची दखल घेत हवालदिल झालेल्या असंघटीत कामगार यांना धीर देण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन राज्यशासनाकडून अनुदान पोटी नोंदणीकृत, अनोंदणीकृत, संघटित, असंघटीत कामगार, माथाडी कामगारांना तातडीने १० हजार रुपयांची मदत करावी, श्री गुलदगड यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments