Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी संस्थानला 17 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत एक कोटी 90हजार रू, ऑनलाईन देणगी प्राप्त


मंदिर बंद काळातही देश-विदेशातील साईभक्तांची मोठी सेवा
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी
शिर्डी - येथे श्रीरामनवमी उत्सवाची नुकतीच सांगता झाली, मात्र यावर्षी कोरोना मुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे येथे श्री साई मंदिरही बंद आहे ,अशा परिस्थितीत येथे रामनवमी उत्सव नुकताच संपन्न झाला , शिर्डीत शुकशुकाट आहे, साईभक्त सध्या येत नाही, मात्र देश-विदेशात साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे, अशा देश-विदेशातील साई भक्तांकडून शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ला 17 मार्च ते 3 एप्रिल2020 या कालावधीत ऑनलाइन एक कोटी 90 हजार 201 रुपये देणगी जमा झाली आहे,
श्री साईबाबांचे मंदिर श्री साईभक्तांसाठी बंद असतानाही श्री साई बाबांवर श्रद्धा ठेवून देश-विदेशातील साईभक्तांनी एवढी मोठी देणगी साईबाबांना ऑनलाइन पाठवली आहे,
सध्या देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये व वाढू नये म्हणून सर्वत्र देशभर 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे देशात व राज्यात सर्वकाही अत्यावश्यक सेवा सोडून बंद आहे ,शिर्डीत ही सर्व ठप्प आहे, श्री साईबाबांचे मंदिरही श्री साई भक्तांना दर्शनासाठी 17 मार्च 2020 दुपारी 3 वाजेपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, साई संस्थांनी आपले सर्व निवासस्थाने व भक्त प्रसादालय बंद केली आहेत, शिर्डीत येणारे बस, रेल्वे ,विमान वाहतूक,, वाहने ,दुकाने,सर्व काही बंद आहे, त्यामुळे साईभक्त येत नाही, शिर्डीत पूर्ण शुकशुकाट आहे, साईबाबांचे मंदिरही बंद आहेअशा लॉक डाउन काळातच श्री रामनवमी उत्सव यावर्षीचा आला, श्री साई संस्थानने लॉक डाऊन चे नियम पाळत गर्दी न करता साध्या पद्धतीने हा तीन दिवस उत्सव साजरा केला, हा उत्सव कालच मोठ्या उत्साहात संप्पन्न झाला, या उत्सावात व 17 मार्च 20 20पासून 3 एप्रिल 20 20 पर्यंत या कालावधीत श्री साईबाबा संस्थान ला देश-विदेशातील साई भक्तांकडून एक कोटी 90हजार 201 एक रुपये देणगी मिळाली आहे, श्री साई समाधी मंदिर बंद असतानाही एवढी मोठी देणगी मिळते, ् एक विशेष आहे, कारण साईबाबांचा भक्त वर्ग देश-विदेशात मोठ्या प्रमाणात आहे, लॉक डाउन मुळे जरी श्री साई बाबांचे दर्शन शिर्डीत येऊन घेता आले नाही, तरी लाखो साईभक्त हे ऑनलाइन श्री साईंच्या दर्शनाचा लाभ घेत असतात व ऑनलाइन श्री साई संस्थान ना विविध रूपाने देणगी देत असतात, असेच श्री साईं वरील श्रद्धा व भक्तीमुळे देश-विदेशातील साईभक्तांनी श्री साई चरणी एक कोटी 90 हजार दोनशे एक रुपये 17 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन साईचरणी अर्पण केले आहे, अशी माहिती श्री साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments