Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या प्राश्वभुमीवर नगर तालुक्यात १९ पथके तयार ; जिल्हाधिकाऱ्यांनी कारणास्तव आढळल्यास कारवाईचे पथकास दिले अधिकार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील विशेषतः शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात पथकाच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. 
या अनुषंगाने अहमदनगर तालुक्यात १९ पथकांची नेमणुका केल्या असून, या पथकांना अनावश्यक फिरत असणाऱ्या वर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
प्रत्येक पथकांमध्ये चार कर्मचारी असणार आहे. या पथकांना कारणास्तव व्यक्ती रस्त्यावर आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पथकामध्ये अहमदनगर तालुका कषि कार्यालय, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. जिल्हा कषी अधिकारी, लिगल मेट्रोलोजी, टेक्नॉलॉजी आँफिसर बायोलाँजीक पेस्ट कंट्रोल, राज्य कर कार्यालयाची तीन पथके, नगर दुय्यम विभाग अहमदनगर कार्यालय या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी असणारे पथके तयार करण्यात आली आहेत.
कोरोना विषाणूची लागण संक्रमित रुग्णांकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याकारणाने तहसिलदार अहमदनगर कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अहमदनगर तालुक्यातील नागरिकांची एक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३० प्रमाणे कोरोना विषाणू संबंधित जनजागृती व आपत्ती व्यवस्थापन कायदा चा भंग होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments