Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरोग्यदायी जीवनाचा 'वाटाड्या' हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई दि. 15: वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. ह. वि. तथा हणमंत विद्याधर सरदेसाई यांच्या निधनाने निसर्ग आणि वैद्यक क्षेत्राची सुयोग्य सांगड घालणारा आरोग्यदायी जीवनाचा वाटाड्या हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. 
डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच साहित्य सेवाही केली. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहित असत. 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती', 'आरोग्याची सुखद पायवाट' यांसारखी आरोग्याविषयी प्रबोधन करणारी अनेक पुस्तक त्यांनी लिहिली होती. आरोग्यविषयक जनजागृतीचे काम त्यांनी आयुष्यभर केले. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आरोग्य विषयक वाटाड्या हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments