Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किसन आटोळे यांना श्री साई युवा प्रतिष्ठानचा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
आष्टी - जागतिक महिला दिनानिमित्त निमबाव बोडखा येथे श्रीसाई युवा प्रतिष्ठाच्या वतीने श्रीक्षेत्र वाहिरा येथील लेखक किसन आटोळे यांना साहित्यरत्न पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, पत्रकार प्रकाश साळवे, घोंगडेवाडीचे सरपंच भिमराव माळशिकारे, राजेंद्र गावडे मा. सरपंच, मनसे नेते भाऊसाहेब मेटे, मुकेश काळे, सरपंच पोपट गावडे,  युवा नेते श्याम धस, सौ. रिमा धस, पांडूरंग गावडे, विकास गावडे, सौ. जयाताई गुंड, प्रतिभाताई थारवे, वाणी मॅडम अर्जुन गावडे उपसरपंच, बोडखा, प्रकाश शेलार, संदिप गावडे, बाळासाहेब फरतारे, बाळासाहेब वाळके, यासीन खान श्रीसाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रघुनाथ मेटे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना आटोळ म्हणाले, साहित्यासाठी मिळत असलेला हा पुरस्कार मला नक्कीच जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.  या संस्थेने कौतुकाची थाप देऊन माझे आत्मबळ वाढविण्याचे काम केले आहे. यामुळे पुढे काम चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन व नवी उर्जा मिळते.  हा साहित्य निर्मितीचा वसा निरंतर चालु ठेवील असे उदगार त्यांनी काढले.
आटोळे यांच्या निवडीबद्दल पंचायत समिती सदस्या सौ. मेघना दादासाहेब झांजे, वाहिरा गावचे सरपंच सौ. शकुंतला फरतारे, उपसरपंच सतिषराव आटोळे, कवी इंद्रकुमार झांजे, पोलिस निरीक्षक आनंद पगारे, तीवसा तालुक्याचे तहसीलदार वैभव फरतारे, दत्ता झांजे, हनुमंत झांजे, सदाशिव पगारे, सोमनाथ शेलार आदींनी अभिनंद केले.

Post a Comment

0 Comments