Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकर्‍याचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान - स्वातंत्र्यसेनानी थोरवे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शेतकर्‍याचा सन्मान म्हणजेच देशाचा सन्मान असून तो जगाचा पोशिंदा आहे. आज शेतकर्‍यांची पत ढासळत असून त्याला कोणीच वाली राहिलेला नाही असे प्रतिपादन थोर स्वातंत्र्य सेनानी साहेबराव थोरवे यांनी केले.

यावेळी युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, पत्रकार प्रकाश साळवे, घोंगडेवाडीचे सरपंच भिमराव माळशिकारे, राजेंद्र गावडे मा. सरपंच, मनसे नेते भाऊसाहेब मेटे, मुकेश काळे, सरपंच पोपट गावडे, युवा नेते श्याम धस, सौ. रिमा धस, पांडूरंग गावडे, विकास गावडे, सौ. जयाताई गुंड, प्रतिभाताई थारवे सरपंच, पुंडे, वाणी मॅडम. अर्जुन गावडे उपसरपंच, बोडखा, प्रकाश शेलार, संदिप गावडे, बाळासाहेब फरतारे, बाळासाहेब वाळके, यासीन खान श्रीसाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रघुनाथ मेटे आदी उपस्थित होते. 
निमगाव बोडखा येथे सालाबद प्रमाणे याही वर्षी श्रीसाई प्रतिष्ठाण संगीतमय साईकथा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून साईबाबांप्रमाणे विविध क्षेत्रातील उल्लेखणीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी थोर स्वातंत्र सेनानी साहेबराव थोरवे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज म्हणाले, आज आपला समाज केवळ स्वत:मध्येच मशगुल झाला असून त्याला दुसर्‍यांचा आनंद पचनी पडत नाही. परंतु साई बाबांनी आपले आयुष्य लोकांना आनंदी करण्यात वेचले. त्यांचा वारसा श्रीसाई प्रतिष्ठाण चालवत आहे. जागतीक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिला व पुरुषांचा सन्मानीत करुन समाजात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न साई प्रतिष्ठाणने केला आहे. आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिक काम केल्यास त्याची पावती मिळते. या प्रतिष्ठाणचा आदर्श घेऊन समाजाने आचरण केल्यास जीवनामध्ये आनंद निर्माण होईल.
पुरस्कार वितरणानंतर जागतिक महिला दिनानिमित्त प्रसिध्द अभिनेत्री मेघना झुझम यांचा ”जागर स्त्री शक्तीचा खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम झाला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात सौ. मिना मेटे या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर सौ. आशाबाई गावडे या मिक्सर च्या मानकरी ठरल्या. या दोन्ही विजेत्यांचा सत्कार श्रीसाई प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आला. यावेळी पंचक्रोशितील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते. प्रस्ताविक भाऊसाहेब मेटे यांनी तर आभार मुकेश काळे यांनी मानले.

श्रीसाई पुरस्कार 2020 चे मानकरी...
श्रीसाई जीवनगौरव पुरस्कार साहेबराव थोरवे, आदर्श शेतकरी पुरस्कार - भाऊसाहेब शेलार, आदर्श शाळा - जि.प. प्रा.शाळा पारोडी,आदर्श शिक्षक पुरस्कार - सुनिल वाळक, सौ. माधवी देशमुख सौ. संगीता म्हस्के, बेस्ट पत्रकार - सूर्यकांत वरकड, कलागौरव - हभप विजय महाराज अभंग, हभप डॉ. गोरख चौधरी महाराज, उत्कृष्ट क्रीडा विद्यार्थी पुरस्कार - कु. कल्याणी रामदास फन्से व कु.हर्षदा संतोष भवर, आदर्श कलागौरव - हभप राजेंद्र गाढवे महाराज, कलारत्न पुरस्कार - सुभाष थोरवे, ईश्वर गव्हाणे, साहित्यरत्न पुरस्कार किसन आटोळे, उद्योगरत्न- बाबासहेब गांगर्डे, बापुराव लाळगे, जयश्री राजेंद्र सायंबर, उत्कृष्ट अधिकारी- सौ. शिल्पा फुलसौंदर, उत्कृष्ट मुख्याध्यापक- संजय गावडे, महादेव पडवळे, , आदर्श ग्रामसेवक - बाळासाहेब थोरवे, सौ. ललिता चंदर बोंद्रे, गोवर्धन सायंबर, बेस्ट चेअरमन भरत शेलार यांना प्रदान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments