Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरदेवळे येथे शरद झोडगे यांच्या हस्ते पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ

 

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील पाझर तलाव दुरस्ती कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या हस्ते यांच्या हस्ते नुकताच झाला.
या पाझर तलावाची दुरुस्तीसाठी अंदाजित रु.14 लाख रुपये खर्चचे आहे. यावेळी शरद झोडगे म्हणाले की, या तलावात चांदबेबी महालाच्या डोंगरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची मोठ्याप्रमाणात आवक असल्याने काही तास पाऊस झाला तरी हा तलाव तुडुंब भरतो. परंतु दुर्दैवाने या तलावाला गळती असल्याने पाऊस उघडल्यावर हा तलाव काही दिवसात कोरडा पडतो. त्यासाठी प्रतिबंध म्हणुन या तलावाच्या गळतीच्या ठिकणी योग्य ती प्रकियाकरुन दुरुस्ती केली जाईल, सोबत पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने यातलावाच्या भिंतीवर तसेच सांडव्याच्या पातळीत वाढ करण्यात येणार आहे. हे प्रयोजन केले असता या भागातील सर्व शेतकऱ्यांना तसेच या तलावाच्या पाझरक्षेत्र असणाऱ्या नागरदेवळे उपनगराला पुढील उन्हाळ्यात पाण्याच्या प्रश्नला सामोरे जावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे. 
यावेळी सरपंच राम पानमळकर, भोसले साहेब पाणीपुरवठा-शाखा अभियंता, ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे, सोबत नंदकुमार परदेशी, अनिल झोडगे, सागर हजारे, राकेश ताठे, बाळासाहेब धाडगे,वासिम सय्यद, फिरोज पठाण, सदाशिव धाडगे, यश गोरे सोबत परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments