Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किरण काळे यांचा ना. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये प्रवेश


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर शहरातून विधानसभा लढविलेले किरण काळे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काळे यांनी कॉंग्रेसच्या मंथन मेळाव्यात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, राजेश बठेजा, अभिजित कांबळे आदींसह महिला कॉंग्रेस, युबक आघाडी, सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, मागासवर्गीय विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जवळपास दहा वर्षे काम केले आहे. ते राष्ट्रवादीत असताना युवक संघटनेचे दोन वेळा प्रदेश उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीने त्यांना युवक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम करण्याची संधी दिली होती.
राष्ट्रवादीमध्ये असताना काळे आणि आ.संग्राम जगताप यांच्यामध्ये कायम सवतासुभा राहिला. याचे पर्यावसन अनेक वेळा संघर्षात देखील झाले. याच संघर्षातून काळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकत बंड पुकारले होते.
काळे यांच्या कॉंग्रेस प्रवेशा मुळे शहरातील कॉंग्रेसला बळ मिळाले आहे. काळे यांची कार्यशैली आक्रमक आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रकाशित केलेला वचननामा चांगलाच गाजला होता.

युवक कॉंग्रेसच्या शहरात शंभर शाखा उघडणार – किरण काळे
प्रवेशा नंतर बोलताना काळे म्हणाले की, कॉंग्रेस हा सर्व समाज घटकांना घेऊन चालणारा आणि व्यापक विचारधारा असणारा राष्ट्रीय पक्ष आहे. राज्याचे नेते प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत.
ना. थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात आगामी काळात युवक कॉंग्रेसच्या शंभर शाखा उघडणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. शहर कॉंग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी आपण कार्यकर्ता म्हणून जीवाचे रान करू. कॉंग्रेसची संघटना शहरात बळकट करू, असे प्रतिपादन काळे यांनी यावेळी केले. 
------------------------------------

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्या बद्दल स्वागत केल. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, राजेश बठेजा, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments