Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यासाठी काम करा ; महसूलमंत्री ना.थोरात यांचे आवाहन


काँग्रेस कमिटीतर्फे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.सत्यजित तांबे यांचा सत्कार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - सरकार बनणार नाही अनेकांना वाटत होते. परंतु शरद पवारांनी पुढाकार घेऊन शिवसेनेला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. सर्वांनी काम करून जिल्ह्यात काँग्रेस वाढवायचे आहे, असे आवाहन महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी केले.
 जिल्हा काँग्रेस, काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी (दि.८) महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात व आ.डॉ. सुधीर तांबे यांचा काँग्रेस कार्यालयातील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

यावेळी जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, उबेद शेख, विनायक देशमुख, दीप चव्हाण, बाळासाहेब भंडारी, सर्व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्ञानदेव वाफारे यांनी प्रास्ताविक सांगितले की, काँग्रेस बळकट करण्यासाठी च्या तालुका स्तरावरील माहिती दिली. ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त १५० शाखा उघडल्या आहेत. जिल्ह्यात गावपातळीवर जिल्हा परिषद गटासह युथ काँग्रेसचे कामाबाबत आढावा दिला. पुढील महिन्यात गाव तेथे काँग्रेसचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, भाजपच्या काही कार्यकर्तेसह अन्यजणांनी ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.Post a Comment

0 Comments