Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आंतरराष्ट्रीय विमानसेवेने येणाऱ्या प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी करावी - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

 

 तपासणीत कोणतीही हयगय चालणार नाही
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे :लोहगाव विमानतळ येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी करावी.यामध्ये कोणतीही हयगय न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
लोहगाव विमानतळ येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी (स्क्रिनिंग) करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून या कक्षाची पाहणी करून डॉ. म्हैसेकर यांनी उपस्थितांना सूचना दिल्या. 
ते पुढे म्हणाले, खास करून इराण,दक्षिण कोरिया ,इटली या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष द्यावे. संशयीत रुग्ण आढळल्यास विमानतळावर स्क्रिनिंग मध्ये पॉजीटीव्ह आढळूनही पुढील उपचारांना ,तपासण्यांना नकार देणाऱ्या प्रवाशांना सक्तीने नायडू हॉस्पिटल येथे दाखल केले जाईल.वेळप्रसंगी पोलिस कारवाईही करण्याबाबत त्यांनी सांगितले.संशयीत रुग्ण आढळल्यास नायडू रुग्णालयात दाखल करण्यासाठी खास रुग्णवाहिका सज्ज ठेवून रुग्णाला बाहेर नेण्याकरिता दोन मीटर रुंदीचा पैसेज करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.विमानतळवर प्रशासनाच्या वतीने तैनात केलेल्या वैद्यकीय पथकाशी आयुक्तांनी चर्चा करून आढावा घेतला.विमान प्राधिकरणाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने संपर्कात राहण्याबाबतही त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.एस. ए. देशमुख,डॉ.नांदापूरकर,विमानतळ व्यवस्थापक नेहल मेंढे,विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कुलदीप सिंग, डॉ. प्राणिल कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments