Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्‍हास्‍तरीय शेतकरी आत्‍महत्‍या समितीच्‍या बैठकीत पाच प्रकरणे मंजूर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर


 अहमदनगर - जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय शेतकरी आत्‍महत्‍या समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्‍हाधिकारी उदय किसवे, जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजी जगताप, अग्रणी बँक व्यवस्‍थापक संदीप वालावलकर उपस्थित होते.
  जिल्‍हास्‍तरीय शेतकरी आत्‍महत्‍या समिती बैठकीमध्‍ये अकरा प्रकरणांवर चर्चा करण्‍यात येऊन पाच प्रकरणे सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आली. यामध्‍ये कै. दौलत भगवत संडे, रा. सोनई ता. नेवासा, कै. आण्‍णासाहेब अर्जून दौंड, रा. शिरसगाव ता. श्रीरामपूर, कै. अमोल काकासाहेब खराडे रा.भोसे ता. कर्जत, कै. मल्‍हारी बाबासाहेब बटुळे रा. भारजवाडी ता. पाथर्डी व कै. संदीप काशिनाथ धाडगे रा. वडगाव तांदळी ता. नगर  या प्रकरणांचा समावेश आहे. शासन निकषात बसत नसल्‍यामुळे कै. दिपक मच्छिंद्र वाकचौरे रा. कळस बु. ता. अकोले, कै.दिपक रामनाथ कोकणे रा.कोकणेवाडी ता. संगमनेर, कै.अंकुश मारुती चेमटे रा. शिंगोरी ता. शेवगाव, कै. सिताराम जाखुजी वाघ रा. चितळी ता. राहाता, कै. गोरख पोपट जेधे रा. पिंपळवाडी ता. कर्जत व कै. सुनिल जाखुजी डोंगरे रा.वडगाव गुप्‍ता ता. नगर ही प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आली. पात्र प्रकरणांमध्‍ये मयत आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांच्‍या वारसांस शासन निर्णयान्‍वये प्रत्‍येकी एक लाख रुपये तात्‍काळ अदा करण्‍याबाबत निर्णय झाला, असे निवासी उपजिल्‍हाधिकारी उदय किसवे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments