Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फिट इंडिया मुव्हमेंट तालुकास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  अहमदनगर - समाजातील प्रत्येक नागरिकांनी शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम करावा अथवा खेळामध्ये सहभाग घ्यावा व प्रकृती स्वास्थ्य राखण्‍यासाठी केंद्र शासनामार्फत फिट इंडिया मुव्हमेंटची अंमलबजावणीची सुरुवात पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते दि. 29 ऑगस्ट, 2019 रोजी  करण्‍यात आली.  फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत शालेयस्तरावर शारीरिक शिक्षकांकरिता FITNESS ASSESMENT TRAINING  देण्‍यासाठी  जिल्‍हयातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव व अकोले या तालुक्‍यामध्‍ये दिनांक 9 ते 13 मार्च 2020 या कालावधीत एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमाची माहिती सर्वांना व्‍हावी. यासाठी तालुकास्तरावर निवडण्यात आलेल्या 50 शाळांना गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमास  उपस्थित राहण्‍याबाबत कळविण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी  निवड झालेल्‍या शाळेतील शारीरिक शिक्षक / शिक्षिकांनी उपस्थित राहावे. प्रशिक्षणासाठी येताना शिक्षकांनी शाळेची संपुर्ण माहिती, पटसंख्या, युडायस क्रमांक, प्राचार्य / मुख्याध्यापकाचे संपुर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, प्रशिक्षणास नियुक्त शिक्षकांचा वैयक्तीक ईमेल आयडी इत्‍यादी  माहिती सोबत असणे आवश्यक आहे.
तालुकास्‍तरीय प्रशिक्षण कार्यक्रम- पारनेर तालुक्‍यासाठी दि.9 मार्च 2020 रोजी समर्थ पॉलिटेक्नीक कॉलेज, म्हसणे फाटा, पारनेर येथे प्रशिक्षासाठी ट्रेनर व नोडल ऑफिसर संभाजी ढेरे (९६८९७१९९९९) व  संभाजी झावरे (९४२२२२४७२६),  व  श्रीगोंदा  तालुक्‍यासाठी महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा येथे दिनांक 9 मार्च 2020 रोजी ट्रेनर व नोडल ऑफिसर संजय डफळ (९९२२१४१९१९), संदेश भागवत (९४२२२२९२८१) व एस एम ढवळे (९८६०२९८२८२), कर्जत  तालुक्‍यासाठी भारत विद्यालय, मिरजगाव  येथे  दिनांक 11 मार्च 2020 रोजी ट्रेनर व नोडल ऑफिसर संभाजी ढेरे व शकुंतला निंबाळकर (८७६६८५६०६४), पाथर्डी  तालुक्‍यासाठी स्वामी विवेकानंद विद्यामंदीर, पाथर्डी  येथे  दिनांक 11 मार्च 2020 रोजी ट्रेनर व नोडल ऑफिसर  संजय डफळ, संदेश भागवत व अभयकुमार वाव्हळ (९४२३४६३६९६), श्रीरामपूर तालुक्‍यासाठी आर.बी.एन.बी महाविद्यालय, श्रीरामपूर येथे दिनांक 12 मार्च 2020 रोजी ट्रेनर व नोडल ऑफिसर  संभाजी ढेरे  व उज्वला गायकवाड (८८०५७५३४५४), कोपरगाव  तालुक्‍यासाठी ओम गुरुदेव उच्च माध्यमिक विद्यालय, कोकमठाण येथे दिनांक 12 मार्च 2020 रोजी ट्रेनर व नोडल ऑफिसर  संजय डफळ, संदेश भागवत व  शबाना शेख (९२७२१४२८९८) व अकोले तालुक्‍यासाठी अगस्ती विद्यालय, अकोले. येथे  दिनांक 13 मार्च 2020 रोजी ट्रेनर व नोडल ऑफिसर  श्री संभाजी ढेरे व राजेश पावसे (९४०४०५२०९)  हे असतीलन.   एक दिवसीय प्रशिक्षणासाठी  सकाळी 10 वाजता  ठिकाणी उपस्थित रहावे असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी कविता नवांदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments