Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टपाल विभागाकडून जिल्ह्यात ८ मार्च ते १४ मार्च दरम्यान आधार सप्ताह


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- टपाल विभागातर्फे आधार कार्ड दुरुस्ती आणि नवीन आधार कार्ड काढण्यासाठी जिल्ह्यात ८ मार्च ते १४ मार्चदरम्यान विशेष आधार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ही सुविधा १६ ठिकाणच्या पोस्ट ऑफिसच्या आधार केंद्रांवर सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत रविवार दि. ८ मार्च ते शनिवार दि. १४ मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहे. 
यामध्ये अहमदनगर टपाल विभागातील
अहमदनगर हेड पोस्ट ऑफिस, अहमदनगर सिटी पोस्ट ऑफिस, अहमदनगर कॅप पोस्ट ऑफिस, अहमदनगर आर एस पोस्ट ऑफिस, आनंदीबाझार पोस्ट ऑफिस, सावेडी रोड पोस्ट ऑफिस, एम आय डी सी पोस्ट ऑफिस व जामखेड, कर्जत, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, सोनई, मिरजगाव, राशीन या ऑफिसचा समावेश असल्याचे अधीक्षक श्री जे.टी.भोसले यांनी कळविले असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments