Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मातृभाषेच्या अवमान प्रकरणी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील दोषींवर कायदेशीर कारवाई अन्यथा मराठीप्रेमीच त्यांना उलटे करतील - शंभुसेना संघटना


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : सब टीव्ही वरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून मनोरंजन करत असताना सामाजिक भान न जपणाऱ्या या मालिकेने चुकीची माहिती दाखवत मराठी भाषेचा अपमान केल्याने मालिकेतील विशिष्ट संवादावर सब टीव्ही आणि मालिकेतील जबाबदार निर्मात्यांनी जाहिर माफी मागावी तसेच दोषींवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मराठी भाषिक शंभुभक्त व शंभुसैनिक संबंधित दोषींना "उलटे" करण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत असा इशारा शंभुसेना संघटनेने दिला आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला असतानाच आता मातृभाषेच्या रक्षणार्थ शंभुसेना सामाजिक संघटनेनेही पत्रकारांना आपली तीव्र प्रतिक्रिया देत,ऐतिहासिक शिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी तीव्र संताप व्यक्त करत मालिकेतील जबाबदार व्यक्तींनी जाहिर माफी मागावी तसेच सरकारने दोषींवर कायदेशीर कारवाई अन्यथा शंभुभक्त व शंभुसैनिकच संबधितांना "उलटे" करतील असा इशाराच शिर्के यांनी दिला आहे.
मालिकेच्या भागात जेठालालचे वडील म्हणेजच बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचे सोसायटीतील इतर सदस्यांना सांगताना दिसत आहेत. 'हमारा गोकुलधाम मुंबई में हैं, और मुंबईकी आम भाषा क्या है ? हिंदी है..इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है, अगर हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो तामिल मे लिखते, अगर हमारा गोकुलधाम अमेरिका में होता तो अंग्रेजी में लिखते..अशा प्रकारचा संवाद मालिकेत दाखण्यात आला असल्यानं यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतल्या नंतर लगेच शंभुसेना संघटनेनेही मराठी भाषेच्या रक्षणासाठी उडी घेत मराठीचा द्वेष करणाऱ्या अशा नीच प्रवृत्तीला कायम विरोधच केला जाईल 'मुंबईची भाषा मराठी आहे..मराठीच राहील हे सर्वांना माहित असताना देखील मालिकांमधून अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय.अशा मराठी भाषेला लागलेल्या किड्यांची वळवळ वेळीच थांबवावी लागेल अन्यथा आपल्या भागात आपल्याला पाहुणे व्हावे लागेल, तसेच मालिकेत काम करणाऱ्या आपल्या मराठी कलाकारांना देखील याबाबत काहीच चुकीचं वाटल नाही का? याबद्दल शरम वाटत नाही का ? अशा शब्दांत मनसे सह शंभुसेनेने आपला संताप व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments