Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वांबोरी घाटात व्यापाऱ्यास लुटणारा जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - वांबोरी घाटात व्यापाऱ्याला आडवून लुटणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विकास बाळू हानवत (वय २४, रा.कात्रड ता.राहुरी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१२ जुलै २०१९ ला वांबोरी घाटातून दुचाकीवरून घरी जात असताना घाटात अचानक एका दुचाकीवरील तिघा अज्ञातांनी दुचाकी आडवून चावी काढून तोंडात मारली. यानंतर खिशातील ६००रुपये रोख, १००० सँमसग मोबाईल असा १,६०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी पंकज अशोक नाबरीया यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास सुरू असताना या गुन्ह्यातील आरोपी पांढरीपुलाजवळ टपरीमागे बसलेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाने सापळा लावून हानवत याला पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोना संतोष लोढे, सचिन अडबल, दीपक शिंदे, प्रकाश वाघ, मच्छिंद्र बर्डे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments