Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या विळख्यातून आपण बाहेर पडू - संदीप मिटकेपोलीस प्रशासनाकडून तृृतीयपंथीय समाजासाठी किराणा मालाचे वितरण
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / बबलू शेख
अहमदनगर दि.२९ - कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जग चिंतेत आहे. सुुरुवातीपासूनच केंद्र व राज्य सरकारने कठोर पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात ठेवून ती पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. मात्र, यात नागरिकांची साथ खूप महत्त्वाची आहे. नागरिकांनी साथ दिल्यास आपण कोरोना जागतिक महामारीच्या संकटावर मात करू. कोणीही उपाशी राहू नये, यासाठी योग्य ते नियोजन शासनाने केले आहे. आज या ठिकाणी जिल्हा पोलीसप्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तृतीयपंथीयांना किराणा सामान देण्यात आले आहे. या महामारीचा सामना करायचा असेल, तर सर्वांनी लॉकडाऊन व संचारबंदीत घरी थांबावे. नियमांचे पालन करावे. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. लवकरच आपण कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या विळख्यातून बाहेर पडू, असा विश्‍वास शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी व्यक्त केला.
कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील तृतीयपंथीयांना दैनंदिन गरजेच्या वस्तु व किराणा माल शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तोफखाना पोलीस स्टेशनचे पीएसआय मेढे, तृतीयपंथी समाजाचे काजल गुरू, रिटा आदी उपस्थित होते.
श्री. मिटके पुढे म्हणाले की, आजच सर्वप्रथम कोरोनाचा बाधित झालेला पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे, ही बाब निश्तिच सर्वांना प्रोत्साहन व प्रेरणा देणारी आहे. समाजातील कोणीही उपाशी राहू नये, यासाठी शासनाने विविध उपाय योजले असून, सामाजिक भावनेतून पोलीस प्रशासनही आपले कर्तव्य निभावत आहे. समाजातील स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येऊन मदतीचा हात दिला आहे. याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
काजलगुरू यांनी पोलीस प्रशासनास विशेष धन्यवाद देऊन संकटकाळी मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले. कोरोना व्हायरसच्या या जागतितक संकटातून देश सहीसलामत बाहेर पडावा, यासाठी यावेळी तृतीयपंथीयांनी प्रार्थना केली.


कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील तृतीयपंथीयांना दैनंदिन गरजेच्या वस्तु व किराणा माल जिल्हा पोलीसप्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पीएसआय मेढे, तृतीयपंथी समाजाचे काजल गुरू, रिटा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments