Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यात अडकलेल्या नगरकरांसाठी खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी सुरू केली हेल्पलाइन

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्णपणे लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील संघातील विद्यार्थी, नागरिक इतर राज्यात अडकलेले आहेत. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचे आप्तस्वकीयमुळे तिकडे चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारसंघांमधून विविध कारणानिमित्त इतर राज्यात नागरिकांना दिलासा मिळावा. ते जिथे आहेत तिथेच त्यांची व्यवस्थित सोय व्हावी या हेतूने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहे. या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून इतर राज्यात अडकलेल्या आपल्या आप्तस्वकीय बाबत माहिती कळवल्यास संबंधित राज्यातील खासदारांना मार्फत व्यवस्था करण्यात येईल व त्यासाठी नागरिकांनी ह्यात हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन खा सुजय विखे पाटील यांनी आज एका व्हिडिओद्वारे केले. केंद्र सरकारने रिझर्व बँक ऑफ इंडिया दिलेल्या सूचनेनुसार वित्तीय संस्थांनी आपली कर्जवसुली तीन महिने थांबवणे सांगितलेली असताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने मात्र कर्ज वसुलीचा तगादा शेतकऱ्यांकडे लावलेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार कारवाई करावी अशी विनंती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळास केलेली आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे झालेले पंचनामे तूर्तास करता येत नसतील तरीसुद्धा लवकरात लवकर नजीकच्या काळामध्ये सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूली यंत्रणेमार्फत करून घ्यावेत अशी सूचना विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली . अहमदनगर येथील डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल द्वारा 24 तास वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार असून ज्या नागरिकांना जाण्याची अडचण असेल किंवा आरोग्य संदर्भात काही समस्या असतील त्या सर्वांसाठी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल हे 24 तास उघडे राहील अशी माहिती सुद्धा खासदार विखे पाटील यांनी यावेळी दिली. लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर पर राज्यातील नागरिकांना परतता येत नसेल अशा नागरिकांनी सुद्धा घाबरून न जाता हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधल्यास त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन खासदार डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिले व हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले . मालवाहतुकीसाठी आरटीओ परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याचे आपण आरटीओ साहेबांच्या निदर्शनास आणून दिले आहे व येणाऱ्या काळामध्ये जर मालवाहतुकीसाठी परवानगीची आवश्यकता असल्यास सुद्धा नागरिकांनी हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments