Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील नागरिकांनी डॉक्टर, पोलीस आणि सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्या सूचनाचे पालन करा : जि.प.अध्यक्षा घुले

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - कोरोनाच्या पाश्वभूमीवर  जिल्ह्यातील नागरिकांनी डॉक्टर, पोलीस आणि गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्या सूचनाचे पालन करा. नाही तर खबरदार! CRPF फोर्सच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले पा. यांनी दिला आहे

‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या तालुक्यातील पोलिस, वैद्यकीय अधिकारी, व गावातील ग्रामपंचायत सरपंच व कर्मचारी यांचा सुचनांचे पालन करा विनाकारण घरा बाहेर पडू नका सूचनांचे उल्लघंन करणाऱ्यांवर 144 आर्तगत गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी काही जिल्हात CRPF पेसेल फोर्सची मदत घेण्यात आली आहे. आपल्या तालुक्यावर व गावावर ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तालुक्यासाठी राम लक्ष्मणाची जोडी समजले जाणारे दोन्ही माजी आमदार घुले बंधुंनी  सध्याच्या परिस्थितीत नागरिकांकडून शिस्तीची गरज आहे. मात्र तालुक्याने देखील सामंजस्यानी सुचनेच पालन कराव,असं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments