Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर महापालिकेच्या केडगाव घरकुल प्रकल्पास पर्यावरण समितीचा अखेर हिरवा कंदील


खासदार सुजय विखे यांच्या शिष्टाई ला यश
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - केंद्र सरकारच्या महत्त्वाची प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत महापालिकेच्या प्रस्तावित केडगाव घरकुल प्रकल्पास अखेर राज्य पर्यावरण समिती म्हणजेच स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंत अथोरिटी ची मंजुरी मिळाली असून प्रकल्पाच्या उभारणीला उभारणीत ला मोठा अडसर दूर झाला आहे. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाला आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या पुढाकारातून मुंबई येथे समितीच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी समन्वय घडवून आणल्याने प्रकल्पातील मोठा अडसर दूर झाला आहे. महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केडगाव येथे अल्प उत्पन्न धारक गटातील लाभार्थी करता घरकुल प्रकल्प केडगाव येथील आरक्षित भूखंडावर प्रस्तावित केला आहे . त्याकरिता यापूर्वीच एजन्सीची नियुक्ती केली आहे . परंतु प्रकल्पास पर्यावरण समितीची मान्यता प्राप्त झाल्याशिवाय बांधकामास सुरुवात करता येत नव्हती. एकीकडे लाभार्थ्यांचा पाठपुरावा आणि दुसरीकडे शासनाची विचारणा अशा कात्रीत पालिका प्रशासन सापडले होते. मध्यंतरी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी महापालिकेत प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात घेतली होती त्या बैठकीमध्ये केडगाव येथील स्कूल योजनेसंदर्भात चर्चा झाली होती. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सुद्धा याबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी मुंबई येथील पर्यावरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रकल्पाबाबत अवगत केले होते. समितीने दहा मार्च च्या बैठकीत प्रकल्प चा आढावा घेऊन प्रकल्पास मंजुरी देत असल्याचे पत्र नुकतेच अहमदनगर महापालिकेस दिले आहे त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे .

Post a Comment

0 Comments