Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनावश्यक प्रवास करणाऱ्यांवर गुन्हे दाखल ; कोतवाली पोलीसांनी त्या सर्वाची मनपा निवारागहात केली रवानगी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - मुळचे राज्यस्थानातील ५३ नागरिकांना वेगवेगळ्या चार वाहनातून कडप्पा (आंध्रप्रदेश) येथून अहमदनगर शहरातून अनावश्यकरित्या जात असताना कोतवाली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान पकडले. या सर्वांवर कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करून त्याची महापालिका निवारागहात रवानगी केली.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (केव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ मार्च पासून लागू करण्यात आला आहे. त्या कायदेशीर आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे.
अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांनी कलम १४४ जारी केलेल्या आदेशानुसार कोणत्याही नागरिकांनी अनावश्यक कारणास्तव प्रवास किंवा अहमदनगर शहरातून फिरु नये. नागरिकांनी घरातच राहून कोरोना विषाणूचा समाजात प्रसार होण्याची साखळी खंडीत करण्यास मदत करावी, अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्यास त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामुळे प्रत्येक नागरिकांनी अनावश्यक कारणास्तव बाहेर येऊ नये, घरीच राहावे अथवा ज्या शहरात आहे, त्या ठिकाणीच रहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याचे नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments