Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुडदे वाहाण्यापेक्षा पोलीसांचा लाठीमार योग्य..


संचारबंदीत किराणा,भाजीपाला, अवैद्य दारुचे भाव गगनाला भिडले 
देशभरात कोरोना रोगाने जग हादरले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रत्येक राज्यात या आजारासाठी राज्य सरकार चिंतेत असताना जनता ऐकत नाही. शासन कोरोनाला हरविण्यासाठी जंग जंग पछाडत असून जनता रस्तत्यावर आल्याशिवाय राहत नाही. 17 मार्च पासुन 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करून जिल्हे, तालुके नाकेबंदी करूनही जनता रस्ता धरुनच आहे. तर दुसरीकडे महसूल, पोलीस वाले दंडुके घेऊन दिसेल त्याला ठोकल्याशिवाय राहातं नाही. एकत्र येऊन गप्पा मारतात उलट चिनचा गेम आहे. त्यामुळे अवैद्य धंदे तेजीत बनले असून किराणा दुकान अत्यावश्यक सेवेत धरले, मात्र आता अव्वाचा माल स्वावाला विकताना दिसत आहे. संचारबंदी 12 नंतर लागू होणार यामुळे क्षणात गोडावुन रिकामे झाले तर दुसरीकडे 14 दिवस घरात बसून रहावे लागणार, या धास्तीने दिवस कसा जाणार यासाठी दारुची खोके बंगल्यात साठा करण्यात आला आहे. शासन स्तरावर सतत काही ना काहीतरी वेगळे प्रयत्न सुरू आहे. प्रवरा नदीला पाण्याचे आर्वतन सुरू असून अनेक तरुण सिड फार्म शेजारी पोहण्यासाठी एकत्र येतात. या ठिकाणी जुगार अड्डे सुरू झाले पोलीस गाडी गेल्यानंतर काही जण आपला जिव वाचविण्यासाठी पाण्यात बसून तर काही जण ऊसाच्चा क्षेत्रात लपून बसतात. अनेक तरुणांनी पोलीसांना चकवा देताना विहिरीत उड्या मारत सुटका केली. प्रशासनाला जनतेची काळजी मात्र जनतेला हा आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटते ? नगर जिल्ह्यातील ४जणांना कोरोना आजाराची लागण झाली. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस.आरोग्य विभाग, जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालीका, महानगरपालीका, नगरपंचायत, ग्रामपंयात, आशा कर्मचारी प्रयत्नशील असून राजकीय नेते, सामाजिक संघटना देखिल कार्यरत आहे. २४ तास ड्युटी करणारे आम्ही पण माणसे आहोत. पण जनता आज ऐकण्याचे मनस्थित नाही. कफ्यु लावा, संचारबंदी करा,१४४ लावा, आम्ही लाठी खावू पण बाहेर फिरून दाखवू हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे. तो आम्ही मिळवणारच असे बोलताना दिसत आहेत ...मास्क सॅन्यीटायझर लिक्कीड मेडीकल मध्ये असुनही संपले. वाहतूक बंद माल कमी मात्र चेरीमेरी करुन तिप्पट भावाने गोडावून मधून देताना दिसतात. मात्र अजुनही नगर जिल्ह्यात या रोगांवर नियंत्रण मिळू शकतो. हा सर्वांचा दावा अधिकारी यशस्वी करू शकतात मात्र जोपर्यंत जनता घरांत शांत बसत नाही. तोपर्यंत हे अशक्य आहे ......अधिकारी ,कर्मचारी भोंगे लावून कितीही सांगत असले, तरीही लोक मोकळ्या हवेत फिरताना दिसतात. आज शासनाने प्रत्येक मेडीकल, दुकान,यांमधील साठ्याची नोंद केली असली तरी किराणा दुकानदार तिप्पट बाजारभावाने मालाची विकीताना दिसत आहे. विचारणा केली तर घेता आले तर घ्या नाहीतर निघा असा सज्जड दम देवू लागले आहे. दारुची चौपट बाजाराने मोबाईलवर घरपोहच सेवा मिळू लागली आहे. काही ठिकाणी खाजगी अंबुलस पोलीसांना चकवा देवून गाडीत महिला बसवून रात्रीतून माल जात आहे. बनावट दारुचे आगमन होवून अनेकांना तिच्यावरच ताव मारताना दिसतात. दोन दिवसांपूर्वी देशी लायसन्स दुकानावर देखील उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत आपला हिसका दाखविला आहे. एका परमिट रुम चालकांवर पोलीसांनी कारवाई करण्याची धमकी देवून शांत बसा नाहीतर दुकान सील करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अनेकांनी १४ तारखेपर्यंत गप्प बसण्याचा निर्णय घेतला असला तरी नवखे मात्र दादागिरी जोरावर parsel काही मुलांना हाताशी धरुन सुरू आहे. खरे तर रस्तावर दुचाकीने फिरणारे रोड रोमियो दारुच्या भटकंतीसाठी फिरताना दिसतात. हे मात्र खरे ..........नगर जिल्ह्यातील परिस्थिती तरी बरी मात्र पुणे जिल्ह्यात हाहाकार माजला असून शेजारील जुन्नर तालुक्यात १९००० हजार लोकांना संशयीत कोरोटाइन शिक्के मारल्याचे समजते तरी अनेकजण अकोल्यात येऊन नातेवाईक यांचा सहारा घेताना दिसतात. तीन दिवसापांसून अवकाळी पावसाचे तांडव सुरूच असून बळीराजा चितेंत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांना फवारणी गरजेची असतांनाच मात्र शेतकरी krushi केंद्र बंद करण्यात आली. जोपर्यंत जिल्हाधिकारी निर्णय देत नाही, तोपर्यंत सुरु करणार नसल्याचा इशारा देण्यात आला. तरी ४ तास तरी ही दुकाने चालु ठेवण्यात यावे अशी मागणी होत आहे. सध्या सलुन दुकान बंद असे असले तरी शटर बंद करुन तडाखा सुरु एवढेच नाही. शेतावर सध्या हा व्यवसाय सुरू झाला कधी न किराणा दुकानात विकणारा गुटखा चढ्या भावाने राजरोसपणे हाताच्या ईशाराने सुरू झाला तर फोनवर जे लागते त्याला वेगळे नावं देवून सुरु आहे ......घरात ,बंगल्यात मोबाईल टिव्ही रिचार्ज दर तिपटीने भाव वाढले. त्यामुळे कोरोना आजाराचा सामना करताना २७ दिवसांत संपुर्ण खिशाला कात्री देणारा ठरेल तर खाजगी फायनान्स ,सावकारशाहीचे मीटर बंद नाही पतसंस्था,सोसायटी फोन करुन वसुलीचा फंडा सुरु ठेवला तर वसुलीला या आम्ही कोरोना देतो असे प्रतिउत्तर जनता देवू लागली आहे. सुजाण नागरीक सांगतात कोरोना आजाराचे मुडदे वाहुन नेण्यापेक्षा,पोलीसांची लाठी कधीही योग्य ना नसेल ऐकत तर त्यांना रक्तदान घेऊन ५०० रुपये दंड मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा घ्या म्हतारी मेल्याचे दुःख नाही, पण सांगुनही अतिशहाणपणा कशासाठी .....हा शहाणपणा करणारे खरे खलनायक मुंबई, पुणे येथून दाखल झालेले सुट बुटवाले !
विश्ववासराव आरोटे 
कळसुबाई शिखरावरुन

Post a Comment

0 Comments