Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महापुरुषांच्या जयंतीवर होणारा खर्च गरीब, दिनदुबळ्यांना द्या ; श्री संत सावता माळी युवक संघाचे आवाहन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - सर्व महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी जयंती ही घराघरात साजरी करावी. दोन्ही महापुरुषांच्या जयंतीवर खर्च न करता, तो खर्च सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात समाजातील गरीब दुबळ्यांसाठी द्यावा, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य या संघातर्फे संघाचे संस्थापक, अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी 
संपूर्ण जगावर तसेच आपल्या देशावर ज्या कोरोनासारख्या महामारी विषाणूपासून हाहाकार झाला आहे, कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारने जे निर्देश दिले आहेत, त्याचे सर्वांनी पालन करा, जरुरी असेल तरच घरा बाहेर निघा, 1 मीटर अंतर ठेवा, NOSE मास्क चा वापर करा, हात स्वच्छ धुवा, अत्यावश्यक सुविधा ह्या रोजच्या रोज व मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. हे आपण सर्व बघत आहोतच, अन्न धान्याचा साठा पुष्कळ प्रमाणात आहे, तरी सर्वांनी राज्य व केंद्र सरकारने केलेले आव्हान तसेच लागू केलेले आदेश, निर्देश, लोकडाऊन याचे पालन करा, असे सचिन गुलदगड यांनी म्हटले.
आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृती किती वैज्ञानिक आहे. याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमनसेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोनापेक्षा घातक आहे. याचाही विचार करा.
येणारी महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही आप आपल्या घरी ह्या महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी लिहिलेले ग्रंथ, कांदबरी, त्यांचे लिखाण वाचून उदा. शेतकऱ्यांचे आसूड, ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, संसार, सत्यधर्म पुस्तिका, शिवाजी महाराजांच्या वरील पोवाडा, त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन साजरी करा. तसेच त्याप्रमाणे यासाठी होणारा खर्च, आपण करणारा खर्च, तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार सुद्धा ह्या दोन्ही महापुरुषांच्या जयंती साठी पुष्कळ प्रमाणात पैसा खर्च करतात तो पुढेही खर्च न करता संपूर्ण देशावर आलेल्या ह्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सोई सुविधा यासाठी खर्च करा असेही त्यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments