Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रस्त्यावर फिरतांना आढळून आलेल्या ३ होम कोरोटाईन असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  रस्त्यावर ३ होम कोरोटाईन असणाऱ्या व्यक्ती फिरताना आढळून आल्या. त्या तिघांवर आरोग्य सुरक्षितेच्या पाश्वभूमीवर गुन्हे दाखल करून प्रथमच पोलिसांनी कारवाई केली आहे. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, त्या होम कोरोनो असणाऱ्यांवर कारवाई ही केवळ, कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होणार नाही. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, या करिता उपाययोजना केली जात आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणू (केव्हाडी १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रोगप्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ मार्च पासून लागू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवास करून आलेले आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तात्काळ नियंत्रण करणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.कोरोना विषाणूचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणू ची लागण एक संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्ती संपर्कात आल्यावर होण्याची शक्यता असते. 
याप्रकारे दूरचा प्रवास करून आलेल्या व्यक्ती यांना आरोग्य विभागाकडून होमकोरोनो अर्थात विलगीकरण तसेच अशा व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असण्याची शक्यता दिसल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये दाखल केले जाते. तेथे त्यासंबंधितांवर उपचार केले जातात.
होमकोरोटाईन केलेल्या व्यक्तींच्या हातावर आरोग्य विभागामार्फत स्टम्पिंग केले जाते. त्या व्यक्तीची आरोग्य सेवक व पोलीस यंत्रणा त्यांच्या निवासस्थानी जाऊन दररोज तपासणी करीत असतात. त्या होमकोरोटाइन असणाऱ्या व्यक्तीवर १४ दिवस घराबाहेर पडता येत नाही, तसे बंधनकारक असते. यामुळेच होमकोरोनोइन केलेल्या ३ व्यक्ती अहमदनगर शहराबाहेर आढळून आल्याने त्या संबंधितांवर कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्यात भादवि कलम २६९,१८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.

Post a Comment

0 Comments