Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बँक कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण नको ; बँक्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर, पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली असता, यात अत्यावश्यक सेवेतील बँक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. परंतु यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बँक ही त्यातील अत्यावश्यक सेवा असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बँकिंग दैनंदिन व्यवहारात निगडित आहे. गर्दी टोळण्याच्या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून बँकांनी आपल्या सेवेच्या कामकाजाच्या वेळेत कपात केली आहे. बँक कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र दिले आहे. त्याची शहनिशा न करता, नगर शहरातील पोलिसांनी बँक कर्मचारी बँकेत अथवा घरी जाताना मारहाण केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर मानसिक परिणाम होत असून त्यांच्या परिणाम बँकेच्या कामकाजावर होते आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना द्यावेत. बँक कर्मचाऱ्यांना बँकेचा गणवेश व ओळखपत्र पाहून बँकेत अथवा घरी येताना आडवून मारहाण होऊ नये, असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments