Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

... छुप्या मार्गाने खेड्यात नागरिक दाखल


शहरातून खेड्याकडे चला हा मूलमंत्र महात्मा गांधी यांनी दिला होता. आज संपूर्ण जगावर कोरोनासारख्या रोगाने थैमान घातले, असून या रोगाने अनेक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देशाचे पंतप्रधान ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासनावर योग्य त्या सूचना देऊन यासाठी प्रशासन पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रातील नाकेबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील नाकेबंदीमध्ये मुंबई, नाशिक, पुणे या शहरातून गावाकडे येणारा लोंढा दोन दिवसांपासून थांबला असला, तरी ग्रामीण भागातील जनतेने देखील सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहे. आपल्यासाठी केंद्र व राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना सरकारला देखील मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आज परिस्थिती ग्रामीण भागांमध्ये मुंबई-पुणे-नाशिक या शहरातून गावात आलेली तरुणांचे टोळके गावामध्ये शांत बसण्यात तयार नाही. गावामध्येचे नागरिक घरांमध्ये शांत पद्धतीने आहेत. हे तरुण याठिकाणी फिरण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी आलेली दिसतात. अनेकवेळा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी या तरुणांना सूचना देऊन देखील तरुण मात्र आपली शोक, मजा करण्यासाठी दिवसभर गावांमध्ये इकडून तिकडे फिरताना दिसतात. अनेकदा अंगावर अर्धवट कपडे घालून मुंबई व पुण्याचा रुबाब ग्रामीण भागातील लोकांवर दाखवताना दिसतात. अनेकदा या तरुणांना गावाकडे येण्यासाठी ग्रामपंचायतीने बंदी घातली असतानादेखील गावातील रहिवासी असल्यामुळे नागरिक देखील भांडणाचा त्रास नको म्हणून शांत बसतात. मात्र हे मुंबई, पुणे, नाशिक याठिकाणी कामानिमित्ताने असलेली गावातीलच मुले आता आपली मौजमजा करण्यासाठी गावातील तरुणांना देखील मद्यपान करून रात्रभर धिंगाणा घालण्याचे काम करत आहे. पोलिस यंत्रणेने अशा मुंबई, पुणे व नाशिक येथील आलेल्या तरुणांवर शिक्के मारून यांना घरामध्ये थांबण्याचे आदेश द्यावे, कोरोना या रोगाची लक्षणे तात्काळ दिसून येत नाही. अनेक तरुण हे मुंबई एअरपोर्ट व आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत काम करताना दिसतात. त्यांना या अगोदर याबाबत सूचना देऊन देखील ते सूचना मान्य करण्यास तयार नाही. आज नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये अशा तरुणांची गावाकडे मोठी रीघ लागली असून, बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील इटली येथे एका तरुणाने संदेशाद्वारे ग्रामपंचायतीने बाहेरून येणाऱ्या तरुणांची रजिस्टरला नोंद करून त्यांना गावाबाहेरील समाज मंदिरामध्ये चौदा दिवस ठेवण्यात यावे, असा संदेश दिला असला तरी अकोल्याचे तहसीलदार अकोले ते पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी देखील संबंधित ग्रामपंचायत ते महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा सर्व विभागांना नोटिसा बजावून देखील हे मुंबई व पुण्याचे तरुण ऐकण्यास तयार नाही, अशा तरुणांना आता तरी पोलिस यंत्रणेने आपला हिसका दाखवले शिवाय पर्याय नाही. अनेक तरुण तर आपणास 17 ते 14 एप्रिलपर्यंत सुट्टी मिळाल्याच्या आनंदात असले तरी हा आनंद मिळवण्यासाठी ते गावाकडे दाखल झाले आहेत. ते घरात राहण्यास तयार नाही त्यामुळे ग्रामीण भागातील इतर लोकांना या लोकांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारण ग्रामीण भागातील लोक हे शिक्षण कमी असून तुम्हाला कळत नाही, अशी अपमानकारक बोलू लागले आहे. गांवगावात, कट्ट्यावर ,पिपंळाखाली, लिंबाखाली, एकत्र येऊन जुगारीचे अड्डे सुरु आहे. तर काहींनी तर गावाबाहेरील हनुमान मंदीर, समाजमंदीरात जुगार अड्डे सुरू करून टाईमपास होत नाही म्हणून हा सर्व खटाटोप सुरु आहे. हा सर्व उद्योग पुणे,मुंबई ,नाशिक,चाकण,पिंपरी चिंचवड,कल्याण ,उल्हासनगर,नवी मुंबई ,नेरुळ,नगर,सांगली,भाईंदर,पालघर,शिरुर, याठिकाणी नौकरी निमित्ताने असलेले अंबड शौकीन यांचा उपद्रवमुल्य दिसून येतो. काही कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुंबई, पुणे, चाकण येथून दुचाकीचा, सायकलच्या माध्यमातून तर काहीजण अॅब्युलंस खाजगी करुन दामदुप्पट रक्कम देवून येताहेत. शासनाने लाॅकआऊट, संचारबंदी,पोलीसांनी वाडीला तेल लावून ठेवले, तरी नागरिक भितीला ना जुमानता आपल्या नातेवाईकांना या या लवकर आपल्या गांवी तर काहींनी तर दुध गाडीचे चालक, वाहक यांना चेरीमेरी देवून डब्यातून पुणे,मुंबई ,चाकण,नवी मुंबई ,कल्याण याठिकणाहुन आजही शेकडो लोक दाखल होत आहे. नगर जिल्ह्यातील अनेक दुध गाडी वाहनांमध्ये ही वाहतूक सुरु आहे, तरी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी चर्चा जनतेतून सुरू आहे. कोपरगांव,संगमनेर,राहुरी,पारनेर,नगर,श्रीरामपुर,शेवगाव, पाथर्डी, नेवासा, शिर्डी, जामखेड, कर्जत ,जुन्नर,आंबेगाव,याठिणाहुन ज्या दुध पिशवी पॅकिंग वाहतूक होते. त्या वाहनामधूनच अशी वाहतूक होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेचा गैरफायदा चेरीमेरी देवून सुरू आहे. रात्रभर काही लोक आपल्या मुंबई ,पुणे येथून मुला मुलींना येण्यासाठी वाट पाहाताना दिसतात, तर दुसरीकडे आता तर शहरी भागात मुली विवाह न करण्याचा निर्णय घेताना दिसतात. नोकरी पेक्षा गांवचा शेतकरी वर बरा अशी वेळ आली आहे तर आज ग्रामिण भागातील मुली व शहरी भागातील मुली पुन्हा एकदा खेड्याकडे येण्याचा निर्णय घेतील. कोरोना व हन्त्या रोगाने जगावर संकट, शहरातील तरूणाईचा गांवात हैदौस,नागरीक संतापले. 
विश्वास आरोटे
कळसुबाई शिखरावरुन .....75888150001

Post a Comment

0 Comments