Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा, जिवंत काडतुस बाळगणारे अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील रामगड येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय २३, रा.बेलापूर, बु खटकळी ता.श्रीरामपूर), सुलतान उर्फ इटकर मुक्तार शेख (वय २४, रा.रामगड ता.श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जिल्हा परिषद उर्दू शाळा रामगड (ता.श्रीरामपूर) येथे दोन जण गावठी कट्टा, जिवंत काडतुस विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची पक्की माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून राजेंद्र चव्हाण व सुलतान शेख यांना पकडण्यात आले, यावेळी त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, ३० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व ५०० रुपयाचे जिवंत काडतुस मिळून आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी आरोपी चव्हाण याच्यावर नाशिक कालिकानगर पोलीस ठाणे व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, सचिन अडबल, पोकाँ राहुल सोळुंके, प्रकाश वाघ, मच्छिंद्र बर्डे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments