Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'जनता कर्फ्यु' दिवशी पोलिस खाकीतील देव माणूस दिसला..


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जनता कर्फ्यु या अभिमानला जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यामुळे सगळे जग थांबल्या सारखी परिस्थिती झाल्याने, या दरम्यान लोकांनी दिल्यावर पोटभरणाऱ्यांची अवस्था वाईट झाली. या परिस्थितीत त्या भुकलेल्यांना अन्न उपलब्ध करून देत त्यांचे समाधान करण्याचे काम अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक सतिष शिरसाट यांनी केल्याने, त्याच्या हकेला पोलीस खाक्यातील देव मदतीला धाऊन आला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकल्याने पोलीस प्रशासनाचे नागरिकांनी मोठे कौतुक केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळून या येणाऱ्या महामारीला एकजुटीने लढा देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात साथ मिळून रविवारी (दि.१५) देशातील प्रत्येक नागरिकांनी 'जनता कर्फ्य' या अभियानाला साथ दिली. परंतु या दरम्यान, हातावर, मोलमजुरी करणाऱ्यासह रस्त्यावर भीक मागून पोटभरणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय परिस्थिती चित्र झाल्याचे समोर आले. या घटनेत आपल्या कामाचे कर्तव्य बजवित असताना वास्तव परिस्थितीची तातडीने दखल घेत, त्या भुकलेल्या भिकारी माणसांना बिस्कीटासह अन्य खाद्यपदार्थ उपलब्ध करुन ते स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन देण्याचे महान काम कोतवाली पोलिस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक सतिश शिरसाट यांनी केले. या घटनेमुळे खाकीतील देवमाणूस समोरच्या आल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या असून, उप पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या या उत्तम कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाची मान उंचवलीच पण सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसाबद्दल चांगले मत निर्माण होण्यास मदत झाली आहे.

Post a Comment

0 Comments