Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोधेगाव बाजारपेठ बंद ; संचारबंदीसारखी परिस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बोधेगाव - शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव, चापडगाव, बालमटाकळी, हातगाव, मुंगी, सह ग्रामीण भागात सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून कोरोना मुक्तीसाठी सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत 

देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा फैलाव होऊ नये साथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मोठे कडक पाऊल हाती घेतले असून आरोग्य, पोलीस व महसूल,प्रशासन शासनाचे आदेशाची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या भारत बंद ला जनतेनी बंद पाळून चांगला प्रतिसाद दिला आहे 
बोधेगाव भागात शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट देऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले घाबरून न जाता बाहेरील देशातील व राज्यातील नवीन येणाऱ्यावर नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्याचा व त्याची माहिती आरोग्य प्रशासनाला द्यावी कोरोना साथीला रोखण्यासाठी एकत्रितपणे सहकार्य करण्याचे अहवान ढिकले यांनी केले.


तसेच प्रशासनाच्या आदेशाला जनता उत्स्फूर्त सहकार्य करीत आहेत बोधेगाव येथे गुरुवारी आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला तर शुक्रवारी व शनिवारी पाठोपाठ चौथ्या दिवशी रविवारी किरणा दुकान व भाजीपाला सह सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातही संचारबंदी सारखे वातावरण बनले आहे व्यवहार ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत होऊन त्याचा सर्वांना फटका बसला जात आहे मात्र त्याचा कोणीही विचार करत नाही रविवारी दिवसभर रस्त्यावर कोणीच फिरकले नाही सकाळी काही जण फिरत होते मात्र पोलिसांनी खाक्या दाखवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे बोधेगाव सह परिसरात उपनिरीक्षक विश्वास पावरा, पोहेकॉ आण्णा पवार, वामन खेडकर ,पोलीस नाईक उमेश,गायकवाड, नामदेव पवार, सचिन खेडकर, ढाकणे, यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता नियंत्रणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले तर बोधेगाव मंडलाधिकारी बडे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे, तलाठी अमर शेंडे परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे 
----------------
बोधेगाव येथे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी व्यवहार कडकडीत बंद ठेवून ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न केल्याने गर्दीचे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत (छाया बाळासाहेब खेडकर)

Post a Comment

0 Comments