Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपा, नगरपालिका, नगरपंचायत आणि कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये खासगी वाहने आणि खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनास ३१ मार्चपर्यंत प्रतिबंध

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
 अहमदनगर, दि. २२- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन अहमदनगर जिल्‍हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅन्‍टोनमेंट बोर्डाचे हददीमध्‍ये नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी सर्व खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे वाहतूकीस आज मध्यात्रीपासून ते 31 मार्च 2020 या कालावधीत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
सदरचा आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही.
1) सर्व शासकीय सेवांशी निगडीत वाहने.
2) रुग्नवाहीका, अग्नीशमन वाहने, वैदयकीय उपचारासाठी लागणारे वाहने. (पुराव्‍यासह)
3) सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्‍थापना यांचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्‍यांसह) 
4) आजारी व्‍यक्‍ती तसेच रुग्‍णालय,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी,दवाखाने आस्‍थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्‍यांसह) 
5) प्रसार माध्‍यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालीके/टिव्‍ही न्‍युज चॅनेल इ.) यांचे कर्मचारी व प्रतिनिधी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्‍यांसह) 
6) दुरध्‍वनी व इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्‍थापनांकडील वाहने तसेच त्‍यांचे अधिकारी/ कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्‍यांसह) 
7) भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले.
8) एस.टी महामंडळ व अहमदनगर महानगरपालीका यांचेकडील बसेस.
9) अहमदनगर जिल्‍हयातील महानगरपालीका, नगरपालीका/नगरपंचयात व अहमदनगर कन्‍टोनमेंट बोर्ड हद्दीतून जाणारे राज्‍य महामार्ग व राष्‍ट्रीय महामार्गावरील मालवाहतूकीची वाहने.(मात्र मालवाहतूक करणा-या वाहनातील प्रवासी वाहतूक प्रतिबंधित राहील.)
 कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.                                 

Post a Comment

0 Comments