Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रीय पत्रकार संघाच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक कासवा, राहाता तालुकाध्यक्षपदी कुणाला जमदाडे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या केंद्रीय पत्रकार संघाच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक कासवा तर राहाता तालुकाध्यक्ष पदी कुणाला जमदाडे यांची नियुक्ती झाली आहे. तसे नियुक्तीपत्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी कासवा व जमदाडे यांना दिले आहेत. केंद्रीय पत्रकार संघ हा पत्रकारांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर राहात आला आहे.

यापुढील काळात पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणार आहे. यासाठी देशातील प्रत्येक पत्रकारास संघटनेत सामावून घेत आहे. या दष्टीकोनातून कासवा, जमदाडे यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील या दोघांच्या निवडीचे अहमदनगर पत्रकार समन्वय समितीसह अन्य सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments