Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मतदारसंघातील प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी ठिकठिकाणी जनता दरबार - ना. प्राजक्त तनपुरे

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर, राहुरी व पाथर्डी मतदारसंघातील प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्‍न तातडीने सुटावेत, या उद्देशाने मतदारसंघातील विविध भागांमध्ये आपण आता जनता दरबाराचे आयोजन करणार आहोत. लोकवस्तीवाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी नगर परिषद स्थापन केली जाते. नगर परिषद स्थापन केल्यानंतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. या भागातील नागरिकांची तयारी असेल, तर त्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा नागरदेवळे आलमगीर गटाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष सय्यद वसीम, जि. प. सदस्य शरद झोडगे, रोहिदास कर्डिले, महेश झोडगे, फिरोज खान, श्याम वाघस्कर, निसार पठाण, भागचंद तागड, केशव बेरड, संजय सपकाळ, गुंड पाटील,  अफजल सय्यद, नईम सरदार, इम्रान बागवान, शेख मतीन, रिजवान शेख, अजहर शेख, हाजी असरार आदी उपस्थित होते.
ना. तनपुरे पुढे म्हणाले की, येथील दहशतीखाली असलेल्या मतदारांनी कोणालाही न जुमानता मला मतदान केले. मला निवडून दिले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या भागात रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा दिसून आला आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वन खात्याची जागा या भागात असून, तेथे घन कचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करू. पाण्याचा प्रश्‍नही तातडीने हाती घेऊन तो सोडवू, असे ते म्हणाले.
शरद झोडगे म्हणाले की, नागरदेवळे व आलमगीर गटात प्रथमच ना. तनपुरे यांनी भेट दिली. येथील प्रश्‍न जाणून घेतले आहेत. त्यांचा मानसन्मान आम्ही केला. 35 ते 40 हजार लोकवस्ती असलेल्या आलमगीर येथे उपकेंद्र सुरू करावे. या भागातील प्रलंबित प्रश्‍न आता सुटतील, असे ते म्हणाले.
सय्यद वसीम म्हणाले की, ना. प्राजक्त तनपुरे यांनी या भागात सरकारी दवाखान्याची गरज आहे, ती पूर्ण करावी. याबरोबरच येथील प्रलंबित प्रश्‍न सोडवावेत. विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. काहीसा हा भाग दुर्लक्षित राहिला आहे. विजयलाईन ते आलमगीर दर्गापर्यंत रस्त्याच्या कामासाठी 40 लाखांचा निधी ना. तनपुरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. हे कामही लवकरच सुरू केले जाईल. जनता दरबारच्या माध्यमातून या भागातील प्रश्‍न सुटतील. विकासकामांना वेग येईल, असे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंजूमभाई शेख, बब्बूभाई शेख, नासीर शेख, नितीन वाकळे, रवी पिल्ले, हनीफ सय्यद, समीर पठाण, आसीफ खान, विकास गायकवाड आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments