Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुरेश गिरे खूनप्रकरणातील चार आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे पूर्ववैमनस्य झालेल्या सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश मोहन गिरी अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दि.१५ मार्चला सायंकाळी ६.४५ वा.सुमारास भोजडे (ता.कोपरगाव) येथे सुरेश शामराव गिरे हे त्यांच्या राहत्या घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुटुंबासह बसलेला असताना एक पांढरे रंगाच्या स्विफ्ट कार व एक काळ्या रंगाची पल्सर दुचाकी या गाड्यांवर आलेल्यांनी रवि आप्पासाहेब शेटे, विजु खर्डे व अन्य अनोळखी इसमांनी सुरेश गिरे यांच्या दिशेने पिस्तूल मधून अंदाधुंदी गोळीबार केला. यावेळी सुरेश गिरे जीव वाचवण्यासाठी घरामागे पळू लागले. या दरम्यान रवि शेटे, विजु खर्डे व त्यांच्या साथीदारांनी गिरे याचा पाठलाग करून त्याच्या वर गावठी कट्ट्याने गोळीबार करीत, हातातील कोयत्याने तोंडावर व शरीरावर गंभीर वार करून ठार केले, आणि माऱ्यकरी आणलेल्या वाहनातून निघून गेल्याची फिर्याद शामराव भिमराव गिरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवि आप्पासाहेब शेटे याने सुमारे १५ दिवसांपासून गुन्ह्याचा नियोजनबध्द कट करुन तळेगाव (पुणे) येथून भाडोत्री मारेकरी आणून गुन्हा केला आहे. या माहिती वरुन तपास सुरू असताना या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी रवि शेटे, विजु खर्डे यांचे साथीदार नितीन अवचिते (तळेगाव स्टेशन, वाघोली पार्क, लाखेवस्ती शेजारी, खांडगे काँलनीसमोर, भारत पेट्रोलपंपमागे, ता.मावळ, जि.पुणे), शरद साळवे (रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड, ता.हावेली, जि.पुणे मुळ रा.घर. नं.३४५, गारखेडा परिसर, इंदिरानगर ता.जि.औरंगाबाद ), रामदास वलटे (रा.लौकी पोस्ट, दहेगाव बोलका, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर), आकाश गिरी (खराबवाडी, संजिवनी हाँस्पिटलसमोर, चाकण, ता.खेड, जि.पुणे) यांना विविध ठिकाणी सापळा लावून पकडण्यात आले, यावेळी पोलीस खोक्या दाखवताचा सर्वांनी गुन्हा कबुल केला. 
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावचे पो.नि.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदिप पाटील, शिशीरकुमार देशमुख, उपोनि गणेश इंगळे, सफौ. नानेकर, गाजरे, पोहेकाँ मुळीक, गोसावी, वेठेकर, गव्हाणे, पोना संदिप कर्डीले, सोनटक्के, शिंदे, चौधरी, लोढे, दळवी, पोकाँ. सातपुते, वाघ, ढाकणे, धनेधर, मासाळकर, बर्डे, मिसाळ, सोळंके, ससाणे, घोडके, माळी, जाधव, पवार, वाबळे, कोल्हे, गायकवाड, चालक भोपळे, बेरड, कोतकर, बुधवंत, कोळेकर, काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments