Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी येथे साईपरिक्रमा उत्साहात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

शिर्डी - येथे साईपरिक्रमा रविवारी (दि.१५) मोठ्या उत्साहात पार पडली. साईपरिक्रमास शिर्डीतील खंडोबा मंदिरापासून सकाळी ७ वा. प्रारंभ झाला. यावेळी प्रामुख्याने सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या समवेत ना.राधाकृष्ण विखे पा. नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, भाजपाचे युवानेते सचिन शिंदे, निलेश कोते यांच्यासह शिर्डी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, शिर्डी साईबाबा संस्थानचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थांसह दिल्ली येथील भाविकांनी सहभागी झाले होते.
ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी परिक्रमा 2020 याची तयारी एक महिन्यापासून सुरू होती, हजारो कार्यकर्ते तरुण, तरुणी वयोवृद्ध, सामाजिक ,राजकीय कार्यकर्ते असे सर्वजण एकत्र येऊन शिर्डीची महिमा व साईंची लीला यांचा संदेश या परिक्रमेद्वारे देण्याचा एकमेव संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता कारण पूर्ण विश्वाला कोरोना चे संकट सतावत आहे. मात्र यावर विज्ञानही हतबल झाले असून यावर प्रतिबंधात्मक औषध अजूनही निर्माण करण्यास डॉक्टरांना यश आले नाही .मात्र साईंनी आपल्या हयातीत शिर्डीच्या सर्व सीमेवर स्वतःच्या हाताने दळलेले पीठ पेरून महामारी सारख्या रोगावर नियंत्रण ठेवण्याचा साक्षात्कार शिर्डीने अनुभवला असून त्याची नोंद साईसाचारित्र या पवित्र ग्रंथात आहे. आज रोजी देशातून लाखो भाविक शिर्डीत येत आहे मात्र कुणालाही कोणत्याच रोगाची लागण अथवा संसर्ग झाला नाही मात्र आमच्या सर्व शिर्डीकरांनी नियोजित केलेली परिक्रमा रद्द करणे मनाला वेदनादायी होते ,जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री नोटीस बजावून आयोजकांना सदर परिक्रमेचा कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागेल आशा प्रकारचा संदेश दिला.एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे कायदा परंतु दोन्हींचा आदर ठेवत अतिशय शांतपणे गर्दी न करता शिस्तीत सर्वांची काळजी घेत विश्वाला कोरोनाच्या संकटातून मुक्तता मिळावी ह्याच उद्देशाने आजची परिक्रमा पार पडली.या परिक्रमेला लाखो जण येऊ इच्छित होते परंतु शासनाच्या आदेशामुळे सर्वांना न येण्याची विनंती केली तेंव्हा काहींच्या भावना दुखावल्या गेल्या तर काहींना रडू कोसळले परंतु आम्ही सर्व शिर्डीकर सर्वांच्या जीवाची मनोभावे काळजी घेणारच कारण आम्हाला तारणारे साईबाबांचे आशीर्वाद आमच्या सोबत सदैव आहे हीच आमची श्रद्धेची शिदोरी आहे.आजच्या श्रदेच्या परिक्रमेत गर्दी जरी कमी असली तरी श्रद्धेची आणि विश्वासाची ताकद अमूल्य होती की जीचे मोल आणि भावना प्रशासनाला नक्कीच समजल्या असतील मात्र माय बाप सरकारने कुठलीही कारवाई करू नये कारण आम्ही कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन केले नाही.ही बाब अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजली आणि ते सुद्धा भावुक झाले. म्हणाले आज आम्ही सुद्धा ह्या परिक्रमेत सहभागी होणार होतो मात्र कायद्याने आम्हाला बंदिस्त करून ठेवले मात्र तुमची मेहनत आणि सर्वांच्या आरोग्यासाठी मोठ्या श्रद्धेने केलेली परिक्रमा व प्रार्थना नक्कीच एक आदर्श आहे आणि याचा जिवंत प्रतेय आजही येणाऱ्या भाविकांना येत आहे.
श्रध्दारुपी ,जंनकल्याणाच्या भल्यासाठी, रक्षणासाठी केलेली आजची परिक्रमा विश्वाला नक्कीच चांगला संदेश देणारी आहे. 

Post a Comment

0 Comments