Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड अझहर शेख जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील फरार असणारा मुख्य मास्टरमाइंड अझहर मंजूर शेख याला शिवनी (मध्यप्रदेश) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.

या गुन्ह्यातील आरोपी निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख (रा.परतूर, जि.जालना) यास अल्पवयीन साथीदारास पकडण्यात आले आहे. परंतु मुख्य मास्टरमाइंड अझहर शेख हा फरार होता. हा दिवसभर शिवानी (मध्यप्रदेश) येथील पेंच अभयारण्यात आपले वास्तव लपवून परिसरातील पिंपरवाणी, खवासा गावात येथे रात्री येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार दोन दिवस सापळा रचून पोलीसांनी वेषांतर करून राहत असलेल्या ठिकाणची पाहाणी केली. यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शताफीने आरोपी अझहर शेख याला पकडले.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकाचे सपोनि शिरीषकुमार देशमुख, पोहेकाँ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना संतोष लोढे, दीपक शिंदे, रविंद्र कर्डीले, मच्छिंद्र बर्डे, सागर सासणे, प्रकाश वाघ, राहुल साळुंके आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments