Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाचा एक रुग्ण ; सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे विलगीकरण कक्षेत दाखल


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचे सांगितले आहे.
अहमदनगर शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे.
त्यांची प्रकती स्थिर व चांगली आहे. सदर रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्षणे आढळून आली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
तथापि नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सध्या गावोगाव भरणाऱ्या यात्रा व उरुसाच्या पार्श्वभूमी वर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

Post a Comment

0 Comments