Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.पशुसंवर्धन समितीतर्फे नुकसानग्रस्त पशुपालकांना आर्थिक मदतीचे वाटप


 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना अहमदनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीतर्फे आर्थिक मदतीचे वाटप सभापती सुनिल गडाख, राजेंद्र परजणे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, सोनाली रोहमारे, संध्या आठरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे आदि उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ही योजना सुरू करणारी अहमदनगर जिल्हा परिषद आहे. मयत झालेल्या एक जनावरांसाठी ५ हजार ते लहान जनावरांसाठी साठी १ हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
सभापती सुनिल गडाख म्हणाले, जनावरे साथीच्या अथवा अन्य कारणाने मयत होतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तेलकुडगाव येथील घटनेतील शेतकऱ्यांचा प्रसंग पाहून मी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्णय घेतला होता.मी पशुसंवर्धन समिती सभापती झाल्यावर त्यानुसारच शेतकरी कुटुंबाना मदत करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केलाआहे. आम्ही फुल नाही, पण फुलाची पाकळी देत आहोत. सामान्य शेकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमच्यावर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी संस्कार केले आहेत. त्यानुसार आम्ही पशुधन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करत आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दुध पिळण्याचे मशीन आणण्यासाठी प्रयत्न आहे.
जि.प. सदस्य राजेंद्र परजणे, या मदतीच्या उपक्रमासाठी राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली होती. पशुधन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी तरतूद नव्हती. यासाठी नुकसान झालेल्या पशुपालकांना मदत करण्यासाठी आम्ही भुमिका नेहमीच मांडत होतो. पशुधन संरक्षण करण्यासाठी पशुधनचा विमा उतरविले पाहिजे. पशुधन टिकविण्याचे शेतकऱ्यांवर मोठे आव्हान आहे.जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा परिषदाने मोठा हात पुढे केला. हा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांनी जनावरांना तपासणीसाठी लँबाची मागणी केली.
Post a Comment

0 Comments