Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सारसनगर भागात पाणी पुरवठा सुरळीत व वेळेवर न झाल्यास ठिय्या आंदोलन ; नागरिकांचा मनपाला इशारा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - सारसनगर मधील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत व वेळेवर न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा बुधवार (दि.११) पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी महादेव काकडे यांना सारसनगर मधील पाणी प्रश्नासंदर्भात नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात दिला आहे.
भवानीनगर तसेच सारसनगर मधील ओम कॉलनी,त्रिमूर्ती चौक,सारस कॉलनी,विद्यासागर कॉलनी,सचिन नगर,संदीप नगर,शिदाजी आप्पा मंदिर परिसर,चिपाडे मळा व महात्मा फुले नगर या परिसरास गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा हा व्यवस्थित होत नसून अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.या विषयीचे निवेदन आज अहमदनगर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी महादेव काकडे यांना देण्यात आले.यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मच्छिंद्रनाथ कोलते,बबन खंडागळे,विकी शेकडे,अशोक साठे,लक्ष्मण कळमकर आदी यावेळी उपस्थित होते.
या भागात या पूर्वी चार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.सदर भागात टँकरद्वारे दीड ते दोन लाख लिटर पाणी मिळत असे,या भागातील टँकर सुद्धा आता बंद झालेले आहेत,त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे.तसेच काही भागात मध्यरात्री म्हणजे रात्री ११.०० ते पहाटे ५.०० वाजता पाणी पुरवठा केला जातो,त्यामुळे महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागते.या सर्व बाबींमुळे पाणी पुरवठ्याबाबत सदर भागातील महिला तसेच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या भागामध्ये टँकरद्वारे दीड ते २ लाख लिटर पाणी दिले जात होते ते जलवाहिनीद्वारे देण्यात यावे.पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करून तो दिवसा देण्यात यावा.या सर्व प्रश्नांची आपण गांभीर्याने दखल घेऊन सदर भागातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपल्या दालनात परिसरातील महिला तसेच नागरिकांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल.अशा मागणीचे निवेदन आज महानगरपालिकेत देण्यात आले. अहमदनगर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी महादेव काकडे यांना सारसनगर मधील पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन देताना नगरसेवक प्रकाश भागानगरे,मच्छिंद्रनाथ कोलते,बबन खंडागळे,विकी शेकडे,अशोक साठे,लक्ष्मण कळमकर आदी.यावेळी उपस्थित होते.(छाया - दिपक कासवा)

Post a Comment

0 Comments