Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कष्टकरी, आदीवासी बालकांसाठी साहित्य निर्माण व्हावे- डाॅ. कैलास दौड


विठ्ठल जाधव यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिरुर कासार ः शालाबाह्य मुले बालसाहित्य वाचत असतील तर ती जीवंत समिक्षा ठरते. आपला भोवताल 'उंदरीन सुंदरीन' कविता संग्रहामध्ये येत असल्याने ते ग्रामीण व नागरी भागातील मुलांचे ज्ञान वाढविण्यासाठी प्रेरक होते. संगणक युगाचा संदर्भ देत कवीने दगडही जिवंत केला आहे. आजची स्थिती पाहीली बालकांसाठी साहित्य निर्माण होणे फार गरजेचे आहे असे मत प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. कैलास दौंड यांनी व्यक्त केले. 
साहित्यिक विठ्ठल जाधव यांच्या 'उंदरीन सुंदरीन' या बालकविता संग्रहाचे आदीवासी मुलांच्या हस्ते प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अस्मिता जावळे होत्या. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. कैलास दौंड, प्रसिद्ध कथाकार प्रा. भास्कर बडे, पत्रकार सूर्यकांत नेटके, डाॅ. अशोक घोळवे, विठ्ठल जाधव, पत्रकार विजयकुमार गाडेकर, डाॅ. भाऊसाहेब नेटके यांची उपस्थिती होती. 
डाॅ.दौंड म्हणाले, एकीकडे झगमगाट वातावरणात प्रकाशन कार्यक्रम होतात. पण ज्यांच्यासाठी बालसाहित्य निर्माण व्हावे त्या उपक्षितांपर्यंत ते पोहचत नाही. शालाबाह्य मुले बालसाहित्य वाचत असतील तर ती जीवंत समिक्षा ठरते. आपला भोवताल 'उंदरीन सुंदरीन' मध्ये येत असल्याने ते ग्रामीण व नागरी भागातील मुलांचे ज्ञान वाढविण्यासाठी प्रेरक होते. संगणक युगाचा संदर्भ देत कवीने दगडही जिवंत केला आहे. 
यावेळी डॉ. भास्कर बडे, अस्मिता जावळे, विजयकुमार गाडेकर, सूर्यकांत नेटके, डाॅ. अशोक घोळवे यांची भाषणे झाली. हरीओम देशमुख याने शिव पोवाड्याचे वीररसात बहारदार सादरीकरण केले. करण बर्डे, सानिका खेडकर या बालकांनाही कविता सादर केल्या. सिद्धार्थ 
सोनवणे, निवृत्ती बेदरे, सतिश मुरकुटे, कन्नालाल खामकर, व्यंगचित्रकार दीपक महाले, समीर पठाण, भरत ढाकणे, बाळू दराडे, विठ्ठल पवार, रा. ज. कातखडे, मारूती जाधव, उद्धव खेडकर, शिवलिंग परळकर, संजय फरतडे, रामराव बडे, विष्णू शिंदे, प्रा.महारूद्र डोंगरे, सुषमा पवार, आजिनाथ देशमुख, आजिनाथ बांदल, आर. एस. खेडकर, जावळे, फंड, पाचे तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, शिंदेवस्ती, जरेवाडी, उकिर्डा च. शाळेचे चिमुकले उपस्थित होते. शिव व्याख्याते अप्पा तांबे यांनी कल्पक सूत्रसंचलन केले.

Post a Comment

0 Comments