Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही - जिल्हाधिकारी द्विवेदी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मिळालेल्या माहितीवरुन तातडीने दुबई वरुन आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची तपासणी केली असता, त्याच्यात कोणतेही कोरोनाचे लक्षण आढळून आले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. पी.एम.मुरंबीकर, जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदिसह शासकीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, सोशल मीडिया वर कोरोनाबाबत चुकीचे माहिती देऊ नयेत, तसे आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. साईबाबा संस्थान, शनिशिंगणापूर देवस्थान रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात व बुथ रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून ठेवली असून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावेत.

Post a Comment

0 Comments