Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्त्री शक्तीचा जागर रथ व मशाल यात्रेचे श्री संत सावता माळी युवक संघातर्फे अहमदनगर शहरात स्वागत


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - राजमाता जिजाऊंचे माहेर सिंदखेड ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे माहेर नायगाव दरम्यान महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करीत काढण्यात आलेल्या रथ व मशाल यात्रेचे श्री स़्ंत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य वतीने नगर शहरात स्वागत केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की,राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले या स्त्री शक्तीचे प्रतिक आहे. राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. तर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करुन समाजातील अंधकार नष्ट केला. आजच्या महिलांसाठी या महान व्यक्तींचे कार्य व विचार दिशादर्शक असून, या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या कार्याला उजाळा मिळून खर्‍या अर्थाने स्त्री शक्तीचा जागार होणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. 
या रथ यात्रेचे प्रमुख दिपकराव ठाकरे व सावित्रीबाई फुले यांचे वंशज अरविंद नेवसे यांचा शहराच्या वतीने आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी सत्कार केला.
संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी फुले दाम्पत्याच्या ईतिहासास उजाळा दिल.
यावेळी , शरदभाऊ झोडगे, कैंन्टोनमेन्ंट उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, बाबासाहेब गाडळकर, दिपक खेडकर, शरद झोडगे, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव, निखील शेलार, भरत गारुडकर, प्रशांत ढलपे, सागर सोबळे, ऋषी ताठे, सुनिल शिंदे, आशिष भगत, बजरंग भुतारे, बाबा पटवेकर, दत्ता जाधव, आशिष भगत, गणेश नन्नवरे, नितीन डागवाले, अशोक कानडे, गणेश धाडगे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments