Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरफोडी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह अटक ; एलसीबीची नगर शहरात कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - घरफोडी करुन चोरी करणारे तीनजण स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. समीर खाँजा शेख (वय २२, रा.सबजलचौक,अहमदनगर), परवेज महेमुद्द सय्यद (वय १९, रा.भांबडगल्ली, भोसले आखाडा, अ.नगर), गणेश उर्फ गौतम संजय भंडारी (वय २०, रा.शिवाजीनगर, कल्याणरोड,अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१० फेब्रुवारीला सारसनगररोडवरील भाजीमार्केट समोरील सौरभ बेकर्स पाइट हे दुकान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फोडून तीन मोबाइल व रोख रक्कमेसह ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला, अशी फिर्याद सलीम अलीम अन्सारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने आरोपी शोध घेऊन समीर शेख याला पकडले. त्याने प्रारंभी उडावाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलीस खाक्या दाखवताच, परवेज सय्यद व गणेश भंडारी आम्ही मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या माहितीवरुन सय्यद व भंडारी याचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात आले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ५,५०० रु.दोन मोबाइल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५० हजार रु.सुझुकी अँक्सेस असा ५५ हजार ५०० रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
एलसीबीचे सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ मनोहर गोसावी, विजय वेठेकर, पोना रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सागर सुलाने आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments