Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी माजीमंत्री विखे पाटील दोन महिन्यांचे मानधन देणार!


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 शिर्डी - माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महिन्यांचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेणारे पहिले आमदार ठरले आहेत.
यासंदर्भात बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,कोरोना सारख्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढाई करण्याची वेळ आली आहे.याची सुरूवात स्वतःपासून करावी म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या संदर्भात काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी राज्यातील रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे.या रुग्णांच्या उपचारासाठी योगदान म्हणून आता सहकार्याचे हात पुढे येवू लागले आहेत.उद्योग क्षेत्राने देखील मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करून आ.विखे पाटील म्हणाले की,लोकप्रतिनिधी या नात्याने आपली असलेली जबाबदारी म्हणून दोन महिन्यांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.भविष्यात आणखी काही निर्णय घेवून कोरोनाच्या विरोधातील या लढाईत योगदान देणार असल्याचे आवर्जून नमूद केले.

Post a Comment

0 Comments