Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी परिक्रमा आयोजक व महोत्सव कमिटीवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वय निर्मागित करण्यात आलेल्या आदेशानुसार रविवारी शिर्डी येथे काढण्यात आलेल्या साईपरिक्रमाच्या संबंधित आयोजकांवर प्रशासनाने शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदेशानुसार शिर्डी भाग, उपविभागीय दंडधिकारी गोंविद शिंदे यांनी शनिवारी (दि.१४) त्यांच्या दालनात शिर्डी येथे होणाऱ्या शिर्डी परिक्रमा महोत्सव संयोजक, आयोजक व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ दि.१३ मार्च २०२०ला लागू झाल्याची माहिती देऊन त्याबाबत शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना व प्रतिबंधात्मक आदेश याची स्पष्ट कल्पना आयोजक यांना देण्यात आली होती. तसेच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भाव अनुषंगाने शिर्डी शहरातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आरोग्याच्या हितासाठी शिर्डी परिक्रमा रद्द करण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले होते. सदर महोत्सवात गर्दी होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यास धोक्यात येणार असल्याने मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३(१) मधील तरतुदी नुसार अनुषंगाने प्रतिबांधत्मक आदेश पारीत करून त्यांची एक प्रत शिर्डी परिक्रमा संयोजक, आयोजक यांना दिली होती.
या आदेशाचे उल्लघंन केल्याने शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजक डॉ. जितेंद्र शेळके, अजित संपतलाला पारख व महोत्सव कमिटी यांनी खंडोबा मंदिर येथून सण अँण्ड सँण्ड, शेळकेवस्ती, बिरोबा मंदिर, साकोरीशीव, गोशाळा मार्ग, खंडोबा मंदिर अशी पायी परिक्रमा आयोजित करण्यात येऊन गर्दी जमवून, परिक्रमा रद्द झाल्याची प्रशासनाला खोटी माहिती देऊन परिक्रमा केली. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपविभागीय दंडधिकारी शिर्डी यांच्या लेखी आदेशानुसार जमावबंदीचा आदेश झुगारून उल्लघंन केल्याने शिर्डी परिक्रमा महोत्सव अध्यक्ष जितेंद्र शेळके, अजित पारख व महोत्सव कमिटी सदस्यांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
यापुढील काळात आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments