Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"कोरोना रोगास एक संधी" म्हणून पाहणाऱ्या संधी-साधुंवर कठोर कारवाईची मागणी- शंभुसेना संघटनाआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : सध्या कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता राज्यात विविध ठिकाणी अत्यावश्यक वस्तुंचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करुन सामान्य जनतेकडून जीवनावश्यक वस्तुंच्या निश्चित किमतींपेक्षा जास्त किम्मत घेणे, पेट्रोल- डिझेलमधे भेसळ, मोजमापात गडबडी, निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीसह अन्यप्रकारे नागरिकांची पिळवणूक होत असल्याने लोकांमध्ये रोष व नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी "कोरोना महामारी एक नामी संधी" म्हणून पाहणाऱ्या काही संधी-साधुंवर कठोर कारवाईची मागणी शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी केली आहे.
देशभरात विविध ठिकाणी लॉकडाऊमुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कमी- जास्त प्रमाणात होत असल्याचा गैरफायदा संधी-साधूंकडून होत असल्याचा प्रकार निदर्शनास येत असून या घटनांमुळे समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे म्हणून अशा समाज-कंटकांवर प्रशासनाने कड़क कारवाई करण्याचे आवाहन शंभुसेना सामाजिक संघटनेने केले आहे.
यात प्रामुख्याने पेट्रोल-डिझेल,औषधे व खाद्यपदार्थ मध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच मोजमापातही गडबड होऊ शकते. याघटनेस अनेक पोषक कारणेही असून यात प्रशासनाकडून जाहिर केलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या योग्य धोरणाचा दुरुपयोग अनेक व्यावसायिक व पंप चालक- मालक करू शकतात. तसेच सध्या सर्वच ऑईल पंप कोणत्याही अवेळी खुले होत असल्याने, इंधन मिळणार नाही म्हणून ग्राहकांची होणारी गर्दी, कंपन्याकडून इंधनाचा पुरवठा होईल का नाही ? या भीतीपोटी पंप चालक- मालक भेसळ करू शकतात, तसेच गरजू ग्राहकांची गरज पाहता पंप चालक पोलिस येतील..पोलिस..म्हणत इंधन घाईघाईने विकत आहेत, शिवाय सध्या तरी शुद्ध- अशुद्धतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे या सर्व बाबींचा विचार करता सरकारच्या अन्न व भेसळ प्रतिबंध खात्याने ऑईल पंपांसह अन्य व्यावसायिकांवर बारीक लक्ष देऊन "भेसळीचा गोंधळ..! आणि मापात पाप करणाऱ्या..? काही लोकांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे शंभुसेना संघटनेने म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments