Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्यांच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवर दरोड्यांच्या तयारीत असणारी टोळी पोलिसांनी सापळा लवून पकडली. ही महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.अटल उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले (वय २३ रा.बेलगाव शिवार, ता.कर्जत, जि.अहमदनगर), सोन्या उर्फ लाल्या उर्फ राजेंद्र ईश्वर भोसले (वय २५), पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले (वय २०), संदिप ईश्वर भोसले (वय २२), मटक उर्फ नवनाथ ईश्वर भोसले (वय १९), ईश्वर गणा भोसले (वय ५२), जितेंद्र संसार भोसले (वय ३०, रा.रुइ नालकोल, ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आली आहेत. तर नाज्या नेहऱ्या काळे उर्फ सोमीनाथ दिलीप काळे (रा.घुमरी, ता.कर्जत जि.अहमदनगर) हा एकमेव फरार आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि.२०) संध्याकाळी नगर सोलापूर रोडवरील वाळुंज गावाच्या शिवारातील गायकवाड फार्मजवळ सापळा लावला, या दरम्यान रुईकडून नगरकडे येणाऱ्या दुचाकी स्वारांना बँटरीचा प्रकाश दाखवून थांबविण्याचा इशारा केला, परंतु दुचाकी स्वारांनी न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अटकाव करीत असताना, त्याच्याकडील हत्याराचा वापर करून पोलिसांनी त्या दुचाकी स्वारांनी विरोध केला. पण यावेळी एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या वेळी पकडण्यात सात आरोपींकडून चार दुचाकी, एक तलवार, दोन कटावणी, एक सुरा, लाकडी दांडके, वायर रोप कटर, मिरची पूड असा एकूण २ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि संदिप पाटील, सफौ मोहन गाजरे, पोहवा दत्ता हिंगडे, फकीर शेख, संदीप घोडके, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, पोना सुनिल चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, दिनेश मोरे, विश्वास बेरड, सचिन अडबल, संदिप पवार, पोकाँ योगेश सातपुते, मयुर गायकवाड, रविंद्र घुंगासे, सागर सुलाने, जालिधर माने, मच्छिंद्र बर्डे, कमलेश पाथरुड, मेघराज कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, रणजित जाधव, रोहिदास नवगिरे, चालक पोहव बाळासाहेब भोपळे, सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments