Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुक्कुट पक्षी व नोव्हेल करोना विषाणूचा संबंध नाही

कुक्कुट उत्पादने मानवी आहारासाठी संपुर्णपणे सुरक्षित ; पशुसंवर्धन आयुक्तालयाचे स्पष्टीकरण

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - चीन व इतर देशागध्ये नोव्हेल करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर रामाज माध्यमातून प्रसारित झालेल्या अशास्त्रीय माहितीमुळे सामान्य नागरिकांत कुक्कुट मांस, अंडी व अन्य कुक्कुट उत्पादने यांच्या बदल गैरसगज निर्माण झाल्याने त्याचा विपरित परिणाम कुक्कुट व्यवसायावर होत आहे, मात्र, कुक्कुट पक्षी व नोव्हेल करोना विषाणूचा संबंध नसून कुक्कुट उत्पादने मानवीआहारासाठी संपुर्णपणे सुरक्षित आहेत तसेच त्यांच्या सेवनामुळे नोव्हेल करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी स्पष्ट केले आहे.

नोव्हेल करोना विषाणू हा सांसर्गिक असुन एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीस संक्रमित होतो. तथापी कुक्कुट पक्षामधील करोना विषाणु मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे नोव्हेल करोना विषाणू संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळुन, शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत, असे डॉ. थोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ग्राहकांनी सोशल मीडीयतील विपर्यास केलेलीं माहिती, बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कडील कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल करोना विषाणूंशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments